बुलढाणा : मृत नातेवाईकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कारानंतर अस्थी गोळा करण्यासाठी ‘ते’ स्मशानभूमीकडे निघाले. मात्र, मृत्यू आपला पाठलाग करीत आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती,मागून येणारे वाहन दाम्पत्यासाठी काळ बनले आणि त्यांचा मृत्यू झाल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले.

मेहकर तालुक्यातील जानेफळ ते लोणी गवळी मार्गावर आज, सॊमवारी ही भीषण दुर्घटना घडली. देविदास भिवसन पवार ( ५०) व इंदूबाई देविदास पवार ( ४४) अशी मृतांची नावे आहेत. ते मोहना ( ता. मेहकर) येथील रहिवासी होते. विश्वी येथील त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाले. अंत्यसंस्कार आटोपले. यानंतर अस्थी आणि राखड गोळा करण्यासाठी स्मशानभूमीच्या दिशेने ते आपल्या दुचाकीने निघाले. दरम्यान, जानेफळ ते लोणी गवळी मार्गावर मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर टिप्पर चालकाने पळ काढला.

Story img Loader