लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : एका विद्यार्थिनीसह विवाहितेच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत दोघींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) च्या पथकाने अटक केली. सदर येथील हॉटेल दुआ कॉंटीनेंटल हॉटेलवर छापा टाकून देहव्यवसाय उघडकीस आणला. देहव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नीला सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्का हेडाऊ (२८) आणि इंद्रजित हेडाऊ (३६) रा. गोळीबार चौक, अशी अटकेतील दलालांची नावे आहेत.

दलाल पती-पत्नी पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देहविक्री करण्यास बाध्य करतात तसेच खोली आणि आंबटशौकीन ग्राहकही उपलब्ध करून देत होते. ही गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबीच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता पती पत्नीने सदर परिसरातील दुआ हॉटेलमध्ये खोली बूक करून ठिकाणी ग्राहकांची व्यवस्था करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पथकाने सापळा रचला आणि एका पंटर ग्राहकाला पाठविले.

आणखी वाचा-नागपूर : त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण तिचा ‘तो’ शब्द ऐकून त्याने जीवनच संपवलं…

पंटर ग्राहकाने सौदा पक्का करताच त्याने पथकाला इशारा केला. पथकाने घटनास्थळी धाड मारून दलाल पती पत्नीला पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन पीडितांची सुटका करण्यात आली. दोन मोबाईल, रोख दहा हजार रुपये व ईतर असा एकूण २८ हजार ४३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द सदर ठाण्यात पीटा अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, हवालदार सचिन बढीये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, अजय पौणिकर, राउत, अश्विन मांगे, नितीन वासने, कमलेश क्षीरसागर, कुणाल मसराम आणि लता गवई यांनी केली.

आर्थिक स्थितीमुळे ती वळली शरीरविक्रीकडे

यातील ३२ वर्षीय पीडित महिला नागपुरातील असून ती विवाहित आहे. आधी कॅटरिंगच्या कामाला जायची. तेथे आरोपी महिला अल्कासुध्दा कामाला होती. तेथून त्यांची ओळख झाली. महिलेला दीड ते दोन हजार रुपये मिळायचे. दुसरी तरुणी (२५) मुळची चंद्रपूरची असून नागपुरात शिकायला आहे. शिक्षणासाठी पैसे आणि रुमभाडे भरण्यास अडचण होती. तिची आर्थिक स्थिती हलाखिची असल्याने ती या व्यवसायाकडे वळली.

आणखी वाचा-वर्धा : पाणी पुनर्भरणाचा नवा अध्याय; डॉ. सचिन पावडे यांच्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट…

विद्यार्थिनी देहव्यापारात

अल्का हेडाऊ ही अनेक महाविद्यालयीन तरुणींच्या संपर्कात होती. नागपुरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना हेरत होती. त्यांची अडचण सोडविण्यासाठी त्यांना रात्रभर हॉटेलमध्ये ग्राहकासोबत गेल्यास ५ ते ८ हजार रुपये देत होती. तसेच विद्यार्थिनीची ओखळही समोर येत नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी आर्थिक अडचण आल्यानंतर अल्काच्या संपर्कात येत होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple was arrested for taking advantage of their financial weakness for prostitution adk 83 mrj