नागपूर : बारा वर्षीय चिमुकलीचा छळ व लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात नियमानुसार आतापर्यंत महिला तपास अधिकारी का नेमण्यात आली नव्हती, अशी विचारणा न्यायालयाने पोलिसांना केली. १५ दिवसांचा तपास पुरुष पोलीस अधिकाऱ्याने केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. आरोपी तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख या तिघांनी १२ वर्षीय चिमुकलीचा अमानवीय छळ केला. याप्रकरणी शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> बदली आदेश टाळले नाही अन् सहा तहसीलदारांना….
आरोपी हिनाचे जामिनासाठी प्रयत्न
पती आणि भावाला अटक होताच हिना खान फरार झाली होती. तिने न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
छायाचित्र काढणारी व्यक्ती कोण?
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी अरमान आणि अझहर यांना व्हिआयपी वागणूक मिळत असल्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिसत होते. मात्र, आरोपी मोबाईलवर बोलताना किंवा जेवत असताना छायाचित्र काढणारी ती व्यक्ती कोण, याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत कुणीतरी छायाचित्र प्रसारमाध्यमांना पुरविल्याची चर्चा जोरात आहे.