अपायकारक मिश्र औषधांवर प्रतिबंधक घालण्यासंदर्भात औषध महानियंत्रक उदासीन असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत प्रतिबंधक कारवाईचे तातडीने परिपत्रक काढावे, अन्यथा कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ताकीद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारताचे औषध महानियंत्रकांना दिली.
आयुर्वेदिक तसेच इतर मिश्र औषधे आरोग्यास हानीकारक असून, त्यांची सर्रास विक्री केली जात आहे. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतहून याचिका दाखल करून घेतली. यासंदर्भात भारतीय वैद्यक परिषदेने (आयएमए) मिश्र औषधांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी मित्र औषधांची तीन विभागात वर्गवारी केली. पहिल्या वर्गात उपयुक्त औषधे, दुसऱ्या भागात डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि काळजीपूर्वक घ्यावयाची औषधे आणि ८७ औषधे आरोग्यास अपायकारक असल्याचे नमूद केले. न्यायालयाने ८७ औषधांवर प्रतिबंधक घालण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निर्देश दिले होते. परंतु याबाबत संबंधित खात्याने कारवाई केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. अपायकारक औषधांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली काय, त्यांचे उत्पादन बंद झाले आहे काय, अशी विचारणा न्या. भूषण गवई आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने केली आणि चार आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
आयएमए २००७-२००८ पासून मिश्र औषधांचा वापराबाबत वेगवेगळ्या व्यासपीठावर मूल्यांकरण करीत आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते.
आरोग्यास अपायकारक काही औषधे
डुलोक्सेटाइन – मेकोबएॅलॅमिन
मेकोनाझोन – ऑरनीडाझोल
नारफ्लो सॅक्सीन – ऑरनीडाझोल
नारफ्लोसॅक्झीन -टिनाडाझोन
नारफ्लोसॅक्झीन – टीनाडाझोन – डिस्क्लोमाईन
मेटोनाडाझोन – फुराझोलायडोन – लॅपॅरोमाइड
ऑफ्लक्झासीन- प्रीडेनाइस्लोन
गॅटीफ्लोक्झीन – ऑरनाडोझन
सेफीक्झाईन – ऑरनाडोझन
फ्ल्कोनाझोन – ऑरनीडोझन- एज्थ्रोमाइसन
सुफ्रक्ध्झीन – ऑरनीडायझोन
डॉक्सीसायक्लीन – टीनीडाझोन
ट्रेट्रासायक्लीन – मेट्रोनायडाझोन
ट्रामाडोव- क्लोर झोनझाझोन
टिजायनाडाईन – पॅरासॉटिमाल
अ‍ॅनाय्लग्वीन- केटोप्रोफेल
अ‍ॅनालॉगिन – पॅरॉसाटिमल – डायझेपॅम
निमेसुलाइड – ड्रोटावरीन
निमिसुलाईड – डिक्लोफिनॅक
अ‍ॅसेक्लोफेनॅक – प्रामाडोल
अ‍ॅसोक्लोफेमॅक – पॅरॉसिटॅमल- टिझानायडीन
आयब्रुफेन- टीजानायडीन
डायक्लोफेनॅक – टिमोट्रीफ्रिझम
डिक्लोफिनॅक – पॅरासिटॅमॉल – टिझानिडिंग
मोसाप्राईड – पॅन्टोप्रोझन

Story img Loader