नागपूर: रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे मोठे रॅकेट समोर आले आहे. सख्ख्या बहिण-भावाने नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना जाळ्यात ओढत तब्बल १२.६५ लाखांची फसवणूक केली.

फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. अलिशा आनंद कैथा (२३) व अंकित आनंद कैथा (२१, संजीवनी क्वॉर्टर, यशोधरानगर) अशी आरोपी भाऊबहिणीची नावे आहेत. रेल्वेत आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत त्यांनी फसवणूकीचे रॅकेट रचले.

job opportunity in food and drug administration laboratories
नोकरीची संधी : अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळांमध्ये भरती
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Aarti is manager at Seva Sahyog Foundation rehabilitating and counseling out of school children
आरती नेमाणे… सेवाकार्याला समर्पित!
readers feedback on loksatta editorial readers
लोकमानस : असले कसले शिक्षक आणि शाळाचालक?
Masaba Gupta on being compared to Om Puri because of her acne scars: How appearance-based criticism can affect mental health
“तुझी स्किन तर…”, अभिनेत्री-डिझायनर मसाबा गुप्ताची सौंदर्यावरून दिग्गज अभिनेत्याशी तुलना; तज्ज्ञ सांगतात मानसिक आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम
harassment of married woman in dombivli by husband and in law for money
बकरी पालन व्यवसायासाठी माहेरहून २० लाख आणले नाही म्हणून डोंबिवलीत विवाहितेचा छळ
Loksatta editorial Yogi Adityanath order to eateries should display the names of the owners in uttar Pradesh
अग्रलेख: …ते देखे योगी!
lokmanas
लोकमानस: बुलेट, बुलडोझरचे उदात्तीकरण निषेधार्ह

हेही वाचा… नागपूर: चारित्र्याच्या संशय! पत्नीच्या पोटात भोसकला चाकू

गणेशन शिवलाल सागर (६१, पाचपावली) यांच्या मुलाला नोकरी हवी होती. गणेशन यांची त्यांचा मित्र दीपक तुमडामच्या माध्यमातून २०२१ साली आरोपींशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची धंतोली बगिच्यात भेटदेखील झाली. ५ मे २०२१ ते २२ मे २०२३ या कालावधीत अलिशा व अंकीतने त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपये घेतले. मात्र कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यांना विचारणा केली असता ते आज काम होईल, उद्या काम होईल, असे म्हणत टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे गणेशन यांच्या लक्षात आले.

हेही वाचा… गोंदिया: अंधारात उभ्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

त्यांनी आणखी माहिती काढली असता आणखी तीन जणांनादेखील आरोपींनी असेच जाळ्यात ओढले होते. आरोपींनी त्यांच्याकडून एकूण १२.६५ लाख रुपये उकळले होते. त्यांना पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. अखेर गणेशन यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर ठकबाज भाऊबहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी या पद्धतीने आणखी लोकांनादेखील फसविले असल्याची शक्यता आहे.