चंद्रपूर : अख्खा जबडा फाटलेल्या अवस्थेतील गाय शहरातील मार्गावर फिरताना दिसली. तिची ही अवस्था पाहून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. काहींनी प्यार फाउंडेशनला माहिती दिली. त्यांनी दोन दिवस गायीवर उपचार केले, मात्र आज या गायीचा मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब गायीने तोंडात घेताच त्याचा स्फोट झाल्याने तिचा जबडा फाटला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हातील घुग्घुस शहरात ही हृदयद्रावक घटना घडली. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब एका गायीन तोंडात घेतला. या बॉम्बच्या स्फोटामुळे गायीचा जबडा छिन्नविछीन्न झाला होता. मालकाने गायीला मरणासाठी सोडून दिले होते. ही गाय शहरातील मार्गांवर फिरताना काहींना दिसली. तिची अवस्था पाहून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. जखमी प्राण्यासाठी धावून जाणाऱ्या प्यार फाउंडेशनचे देवेंद रापल्ली यांना काहींनी माहिती दिली. प्यार फाउंडेशनच्या पथकाने गायीला उपचारासाठी हलविले. जखम फार मोठी होती. गायीवर दोन दिवस उपचार केले गेले. मात्र, आज गायीने अखेरचा श्वास घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cow dies after bomb explodes in mouth incident in chandrapur rsj 74 ysh
Show comments