पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलात घडली. ठेमाजी माधव आत्राम (५०, रा. देशपूर), असे मृत गुराख्याचे नाव आहे.

हेही वाचा >>>नागपूर : समृद्धी महामार्ग, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते – फडणवीस

ठेमाजी आत्राम हा आज सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गुरे चारण्यासाठी देलोडा बीट क्रमांक १० मधील जंगलात गेला होता. दुपारी एक वाजताच्या सुमारास झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने ठेमाजीवर हल्ला करून त्यास ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून शेतीची कामे करणे अवघड झाले आहे.

Story img Loader