लोकसत्ता टीम

बुलढाणा : तुळशी विवाहानंतर आता लग्न समारंभाला सुरुवात झाली आहे. लग्न सोहळा म्हणजे दोन कुटुंबांसाठी जीवनभर लक्षात राहावा असा आनंदोत्सव. लग्नानंतर कुटुंबीयांना नवपरिणीत जोडप्याकडून अपेक्षा असते ‘गोड बातमी’ची. जवळच्यांना ही शुभ बातमी लवकर कळते. मात्र दुरच्यांना कळते ती ‘डोहाळे जेवण’साठी आयोजित सभारंभातून. साधारणतः गर्भवतीच्या सातव्या महिन्यात हा सोहळा पार पडतो. हौशी सासरची मंडळी मोठ्या थाटात हा सोहळा साजरा करतात. आता डोहाळे जेवण म्हणजे यात नवल काय ? असे वाचकांना वाटणे स्वाभाविक आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा

मात्र हे डोहाळे पुराण सांगायचे कारण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात एक खास डोहाळे जेवणाचा सभारंभ पार पडला. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर, थोडा धीर धरा…, हे डोहाळे जेवण एखाद्या महिलेचे नसून एका गोमातेचे अर्थात गाईचे आहे. विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या गावातील मगर परिवाराने हा अभूतपूर्व सोहळा आयोजित केला होता.

आणखी वाचा-नागपूर : रानडुकराने धडक दिली, दुचाकीस्वार ठार

भूतदयेचा कळस!

आपण प्राणीमात्रावर दया करायला हवी, त्यांना माणसाप्रमाणे जीव लावायला हवा, जीवापाड जपायला हव, असे फक्त म्हणतच असतो किंवा फक्त ते पुस्तकातच वाचतो. परंतु देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील मगर परिवाराने हे प्रत्यक्षात उतरवले आहे. मगर परिवाराने चक्क गोमातेचे डोहाळे जेवण केले. जिल्ह्यातील हे पहिले आगळेवेगळे डोहाळे जेवण ठरले आहे. आपल्या अतिशय लाडाच्या गाईवर मगर परिवाराचे अगदी आपल्या कुटुंबीयातील सदस्याप्रमाणे प्रेम आहे. त्यामुळे ती आई होणार या बातमीने मगर परिवाराला आनंद झाला. त्यांनी या गोमातेचे अतिशय उत्साहात व आनंदात डोहाळे जेवण केले.

आणखी वाचा-Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया शिवशाही बस अपघात : मृतकांची संख्या ११, आणखी वाढण्याची शक्यता

परिसरातील शेतकरी, माता-भगिनी यांना बोलावून गोमातेचे डोहाळे जेवण वाढून मुक्या प्राण्यांवर सुद्धा आपण माणसाप्रमाणे प्रेम करावे. त्यांना सुद्धा माणसाप्रमाणे वागणूक द्यावी, असा संदेश दिला. आदर्श, उत्तम उदाहरण पांडुरंग तुळशीदास मगर, वसंता मगर, गणेश मगर, व मगर परिवाराने समस्त जनतेला घालून दिले. पाळणा, पुष्पहाराची सजावट ओटीभरण, आणि मिष्टान्न जेवण असे सर्व विधी करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक आणि खमंग चर्चा संपूर्ण मेहकर तालुक्यात होत आहे.

Story img Loader