नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात ‘सोशल पोलिसिंग’मुळे सकारात्मक परिणाम दिसत आहे. युवा वर्ग रोजगार, शिक्षणाकडे वळायला लागला आहे. गेल्या चार वर्षात एकही युवक नक्षलवादी चळवळीकडे गेला नाही. ‘सोशल पोलिसिंग’मुळे अशा चांगल्या गोष्टी घडत आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

निलोत्पल म्हणाले, गडचिरोतील युवक व युवतींना शिक्षणाचे महत्व कळले आहे. नक्षल चळवळीला पूर्वीसारखा प्रतिसाद नाही. छत्तीसगढ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यातील नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. त्यामुळे अनेक मोठे नक्षल नेते आत्मसमर्पण करण्याच्या मार्गावर आहेत. काही जण चळवळीतच निष्क्रिय झाले असून चुकीच्या मार्ग अवलंबविल्याचे सत्य त्यांना कळून चुकले आहे. नक्षलवादी चळवळीला हादरा देण्यासाठी आणि गावकऱ्यांना चांगला मार्ग दाखविण्यासाठी गडचिरोली पोलीस सातत्याने समूपदेशन, मार्गदर्शन आणि सहकार्याचे धोरण राबवत आहेत. गडचिरोलीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावकऱ्यांची पोलिसांना मदत होत आहे. पोलिसांवरील गावकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. हीच आमची जमेची बाजू आहे. नक्षलवाद्यांशी संपर्काचा संशय घेऊन कुणालाही त्रस्त केले जात नाही. नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. चळवळीचा चुकीचा मार्ग सोडून समाजात सामान्य जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांना पोलीस संरक्षण देत आहेत. त्यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी केवळ नागरिकांना सुख-सुविधा मिळाव्या यासाठी अनेक विधायक कार्याला गती दिली आहेत. तसेच अनेक साजाजिक उपक्रम यशस्विपणे राबविले आहे. सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी आणि संपर्क तुटू नये म्हणून पोलीस नेहमी सकारात्मकता दाखवतात. गडचिरोलीतील रस्ते असो किंवा नदीवरील पूल असो, वीज किंवा पाणी पुरवठ्याची सोय असो, या सर्व बाबींमध्ये पोलिसांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून निर्विघ्न निवडणुका पार पडत नव्हत्या. कुठेतरी हिंसक घटना होत असल्याची नोंद आहे. परंतू, गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीच्या काळादरम्यान एकही अनुचित घटना घडली नाही. गडचिरोलीतील सामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी ‘मोबाईल टॉवर’ लावण्यात आले. नक्षलप्रभावित भागात नक्षल्यांच्या विरोधाला न जुमानत डांबरी रस्ते तयार करण्यात आले. पावसाळ्यात गावांचा एकमेकांशी संपर्क तुटू नये म्हणून कमी कालावधीत नदीवर पूल बांधला. दिवसेंदिवस पोलिसांकडून होत असलेले सहकार्य बघता आता गावकरीसुद्धा पोलिसांशी जुळले आहेत.

academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
cyber crimes loksatta news
पुणे : सायबर चोरट्यांच्या जाळ्यात नागरिक; सव्वा कोटींची फसवणूक
pune crime news
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे
policy prepared to implement new measures for safety of students in schools in state
शाळांच्या प्रसाधनगृहात आता गजराची व्यवस्था…काय आहे विद्यार्थी सुरक्षेसाठी नवे धोरण?

हेही वाचा >>>चंद्रपूर : “सरकारचा लाडक्या बहिणींच्या घरात दरोडा!” विजय वडेट्टीवार यांची टीका

आत्मसमर्पणाचा मार्ग उत्तम

नक्षलवाद्यांना चकमकीत कंठस्नान घालण्यापेक्षा त्यांचे आत्मसमर्पण करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर माझा विश्वास आहे. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना जीवन व्यापन करण्याची पूर्ण जबाबदारी प्रशासन घेतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केल्या जाते, असे अधीक्षक निलोत्पल म्हणाले.

गिरीधरच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला हादरा

तब्बल १८० गुन्हे दाखल असलेला नक्षल्यांच्या दंडकारण्यय विशेष विभागीय समितीचा सक्रिय सदस्य जहाल नक्षलवादी नेता गिरीधर तुमरेटीने पत्नी संगितासह नुकतेच पोलिसांसमोर आत्ममर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. यानंतर नक्षल चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून येते. परिणामी अनेक मोठे नक्षल नेते आत्मसमर्पणाच्या मार्गावर आहेत. यामुळे गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीवर अंकुश बसला आहे. सध्यस्थितीत उत्तर गडचिरोलीत नक्षलवादी चळवळ संपुष्टात आली असून आता केवळ ४६ नक्षलवादी जिल्ह्यात शिल्लक आहे. याचे संपूर्ण श्रेय गडचिरोली पोलिसातील प्रत्येक जवानाला जाते.

हेही वाचा >>>दुग्धविकास प्रकल्पाची व्याप्ती वाढली; शेतकऱ्यांना १३,४०० दुधाळ जनावरांचे…

दादालोरा खिडकी प्रभावी उपक्रम

दादालोरा खिडकी सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून नक्षलवाद संपविण्यासह नक्षल प्रभावित आदिवासी नागरिकांमध्ये शासनाच्या प्रती विश्वास निर्माण करण्याचे काम पोलीस विभागाने केले आहे. या माध्यमातून आज घडीला ७ लाख ३८ हजार नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात आले. सोबतच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ११ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासह रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. २१०० तरुणांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी तब्बल ३९० तरुण गडचिरोली पोलीस दलात भरती झाले आहेत. यामुळे पोलिसांबद्दल नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना असलेली भीती दूर करण्यात पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.

सकारात्मक ऊर्जेने भरलेले ‘सी-६० कमांडो’

गडचिरोली जिल्ह्यातील सशस्त्र नक्षलवादी चळवळीला त्यांच्याच भाषेत उत्तर देत चळवळ खिळखिळी करण्यात ‘सी-६०’ या विशेष नक्षलविरोध पथकाचे महत्वपूर्ण योगदान कुणीही नाकारु शकत नाही. गेल्या दोन दशकात या पथकाने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राबविलेले नक्षलविरोधी अभियान हे त्याच्या यशाचे द्योतक आहे. मधल्या काही मोठ्या चकमकीत ‘सी-६०’ जवानांनी आपल्या पथकाला कोणतेही नुकसान होऊ न देता नक्षल्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकवला. अशा अनेक कठिण प्रसंगांना तोंड देत हे जवान कोणत्याही क्षणी नक्षल्यांना उत्तर देण्यास तयार असतात. गडचिरोलीच्या सुरक्षेसाठी या जवानांचे हे समर्पण कौतुकास्पद आहे.

Story img Loader