* उत्तर नागपुरातील रस्ते * गुणवत्तेबाबत अनेक संस्था संघटनांच्या तक्रारी

सिमेंट रस्त्यांच्या बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून त्या माध्यमातून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे दिसून येताच शहरातील विविध संघटना, जागरूक नागरिक यासंदर्भात तक्रारी करण्यास पुढे येऊ लागले आहेत.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

जनमंचने लॉ कॉलेज चौक ते लेडिज क्लब रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांच्या दर्जाचे थोतांड चव्हाटय़ावर आल्यावर इतर संघटना तक्रारी करीत आहेत. उत्तर नागपुरातील दहा नंबर पूल ते आवळे बाबू चौक सिमेंट रस्त्यांचे काम बांधकाम सुरू असून रस्त्याच्या एका बाजूने रहदारी सुरू झाली आहे. त्या रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात सक्षम बहुउद्देशीय संस्थेने ‘लोकसत्ता’कडे तक्रार केली आहे. रस्त्याचे काम पूर्णपणे झाले नाही तरी कुठे सिमेंट निघाले तर कुठे गिट्टी उघडी पडली आहे. संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नागेश वानखेडे यांनी केली.

शहरातील विविध भागातून सिमेंट क्राँकिट रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. भांडे प्लॉट ते छोटा ताजबाग या रस्त्यांचे काम सुरू आहे. एका बाजूने रहदारी सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांवरचे सिमेंट निघून वाळू बाहेर आलेली आहे. रस्त्यांच्या कामात गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

कॉटन मार्केट चौक ते आग्याराम देवी चौक हा रस्ता महिनाभरापासून खोदून ठेवण्यात आला आहे. तसेच बुधवारी बाजार, सक्करदरा या रस्त्याची अवस्था तशीच आहे, अशी तक्रार जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेने निवडणुकीपूर्वी सिमेंट रस्त्याची कामे हाती घेतले, परंतु रस्ते बांधकामाची गुणवत्ता दिसून येत नाही. सिमेंट वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

महापौर कार्यालयाला तक्रार करावी

जनतेने सिमेंट रस्त्यांच्या तक्रारी महापौर कार्यालयाला कराव्यात. ज्या रस्त्याच्या तक्रारी येतील. त्याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित कंत्राटदावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

गुळगुळीत रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब

रस्त्याच्या मधोमध असलेले वीज खांब हटविण्यासाठी महापालिका व महावितरणने ५०-५० टक्के खर्च करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी ९१ कोटीचा खर्च अपेक्षित होता. दोन्ही विभागाने पहिल्या टप्प्यात २१.५ कोटीचा खर्चाचा वाटा उचलला असून त्यातून केवळ ३० टक्के कामे पूर्ण झाली मात्र, निधी संपताच कामे रखडली. त्यामुळे  रस्त्यावरचे  खांब ‘जैसे थे’ असून ते वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. पूर्व आणि पश्चिम नागपुरातील अनेक रस्त्यांवरील खांब अजूनही तसेच उभे आहेत. हिंगणा ते पारडी रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. या मार्गावरील विजेचे खांब हटविण्याची मागणी सार्वजानिक बांधकाम विभागाने महावितरणकडे केली आहे. त्यासाठी महावितरणने ५८ कोटीची डिमांड दिली. मात्र बांधकाम विभागाने केवळ ५ कोटीच दिले आहे. त्यातून भूमिगत वाहिन्या टाकण्यात येत आहेत. महाराजबाग मार्गाचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली असली तरी खांब मात्र तसेच आहेत. खांब हटविण्यासाठी महावितरणने महापालिकेला दीड कोटीची डिमांड दिली, परंतु महापालिकेने पैसे दिले नाही. वर्धमाननगरातील क्वेटा कॉलनीत सिमेंट रस्त्याचे काम अजूनही अपूर्णावस्थेत असून रस्त्याच्या मध्ये वीज खांब तसेच आहेत. यामुळे अपघात होऊ लागले मात्र, महापालिका आणि वीज विभागाकडे त्याकडे दुर्लक्ष आहे. काँग्रेसनगर विभागातील रस्त्यावर असलेले खांब हटविण्यासाठी ४.८२ कोटीचा खर्च अपेक्षित होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.

४३५ खांब हटविले

ज्या भागात सिमेंटीकरणाची कामे झाली आहे. तेथील वीज खांब हटविण्यात आले आहे. महावितरण आणि महापालिका संयुक्तरित्या ही मोहीम राबवित आहे. निधीची अडचण नाही. गेल्या तीन महिन्यात ४३५ खांब हटविण्यात आले असून काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. येत्या दोन महिन्यात उर्वरित असलेले रस्त्यावरील मधोमध किंवा कडेला असलेले खांब हटविले जाईल, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी सांगितले.

Story img Loader