नागपूर : शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत आधार कार्ड तयार होताना आपण बघितलेच आहे. परंतु आता नवजात बाळांचेही आधार कार्ड काढले जात आहे. जन्मत: आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया कशी केली जाते याची सगळ्यांना उत्सुकता असते. नागपूर जिल्ह्यात बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच नवजात बालकाचे आधार कार्ड काढण्यात आले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
जिल्ह्यात सध्या ‘आधार कार्ड ॲट बर्थ’ ही योजना राबवली जात आहे. त्यानुसार प्रसूतीदरम्यान संबंधित महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड जन्म दाखल्यासाठी घेतले जाते. प्रसूती झाल्यावर त्याचे आधार कार्ड काढण्यासाठी त्याच्या आईच्या अंगठ्याचे ठसे घेऊन ते मुलाच्या छायाचित्राशी जोडले जाते. यासाठी जवळच्या टपाल कार्यालयातून पोस्टमॅनची मदत घेतली जाते.
हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद
नागपूर जिल्ह्यात वैशाली आणि नरेश वाघाडे यांच्या बाळाला आधार कार्ड देण्यात आले. या मुलीचे नाव गायत्री ठेवण्यात आले आहे. गायत्रीचा जन्म ६ ऑक्टोबरला बेला पीएचसीमध्ये झाला होता. दोनच दिवसात ८ ऑक्टोबरला आधार कार्ड काढण्यात आले.बेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत पाच ते सहा बाळांचे आधार कार्ड काढण्यात आल्याचे बेला प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास ढोक यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.