नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपुरातील प्रशिक्षण केंद्रात नकली मुस्लीम, हिंदू, शिखांची निर्मिती केली जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी केला. बहुजन संघर्ष समितीच्या वतीने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित शेतकरी रॅलीत ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर किसान संघर्ष समितीचे सुनीलम आणि नागेश चौधरी, माजी मंत्री सुनील केदार आणि इतरही शेतकरी नेते उपस्थित होते.

टिकैत म्हणाले, ‘आरएसएस’च्या केंद्रात तयार होणाऱ्या या नकली मुस्लीम, हिंदू, शिखांना मग वेगवेगळ्या धर्मांच्या समितीवर नेमले जाते. हा प्रकार सर्वांची विचारधारा बदलण्याचा प्रयत्न आहे. या लोकांना येत्या ५० ते १०० वर्षांत देशाचा इतिहासही बदलायचा आहे. केंद्रातील सत्ताधारी व ‘आरएसएस’ला संविधान आणि कायदा मान्य नाही. त्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यासाठीच मध्यप्रदेश व महाराष्ट्रात निवडून आलेल्या सरकारला उलटवून त्यांनी कशी सत्ता मिळवली लोकांनी बघितले. चांगल्या देशासाठी विपक्ष मजबूत हवा. विरोधी पक्ष कमकुवत झाल्यास हुकूमशहाचा जन्म होतो. भारतातही त्याची सुरुवात झाली आहे.

Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ubt leader aditya thackeray in loksatta loksamvad event for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका
Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
shankar prasad allegation on congress
ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती

हेही वाचा >>> नागपूर : धर्म आचरणाने वाढतो, डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

केंद्रातील भाजपच्या सरकारसह ‘आरएसएस’ला मानव, शेती, व्यापाऱ्यांशी देणेघेणे नाही. त्यांचा देशातील ४० टक्के जागांवर डोळा आहे. जागा कार्पोरेटच्या हाती देऊन तेथे उद्योग वा शेती करून येथील लोकांना कामगार बनवायची होती. भारतात मजुरी कमी असणेही त्याला कारण आहे. सध्या संपूर्ण मीडियावर सरकार व ‘आरएसएस’चे नियंत्रण आहे.

हेही वाचा >>> चमत्काराचे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर कारवाई का नाही?

दिल्लीत आंदोलनातही ते दिसले. त्यामुळे विरोधकांना प्रश्नही ठरवून विचारले जातात. देश, शेतकरी, कष्टकऱ्यांना वाचवण्यासाठी सगळ्यांना तीव्र आंदोलनासाठी तयार रहावे लागणार असल्याचेही टिकैत म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वीज यंत्रणेच्या खासगीकरणाच्या विरोधातील वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासह स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालाही समर्थन घोषीत केले.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचे काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम जेल’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

…तर ‘त्यांनी’ ऑनलाईन शिक्षणावरही प्रतिबंध लावला असता

दिल्लीतील आंदोलनादरम्यान करोनामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल तंत्रज्ञान जास्त कळत नसले तरी त्यांची मुले शिकताना अधूनमधून आंदोलनाच्या घडामोडी सांगायचे. त्यामुळे आंदोलनात ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत असल्याचे भाजप-‘आरएसएस’ला तेव्हा कळले असले तर त्यांनी या शिक्षणावरही प्रतिबंध घातले असते. महाराष्ट्रात आंदोलनाच्या मजबुतीसाठी कुणीही कार्यक्रम घेतल्यास मी किंवा आमचे नेते येतील. येथील शेतकऱ्यांनी सर्वत्र संयुक्त मोर्चा समिती बनवावी.