लोकसत्ता टीम

नागपूर : हवामान खात्याकडून वातावरणाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी येणाऱ्या दिवसात मदत व पूर्ववसन विभागाकड़ून लवकर वातावरणासंबंधी एका नव्या सॅटेलाईटची निर्मिती करण्यात येणार आहे.

Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….

देशातील पहिली अशी सॅलेटाईट सेवा असणार असल्याची माहिती राज्याचे मदन व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अनिल पाटील नागपूरात पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या सॅटेलाईट मार्फत दर दोन तासानी रेड लाइन परिसरात अलर्ट देता येईल.

आणखी वाचा-सोयाबीनवर तो ‘पिवळा मोझॅक’ नसून… शास्त्रज्ञांच्या पथकाचा शासनाला अहवाल

समुद्राखालच्या हालचाली म्हणजे सायक्लोन सारख्या परिस्थिती, ढगफुटी सारख्या परिस्थिती, भूगर्भातील हालचाली, भूस्खलन करता जबाबदार जमिनीच्या भेगांबाबतची माहिती या सॅटेलाईट मार्फंत मिळू शकेल. मदत पुनर्वसन विभागाकडून लवकरच हे ॲडव्हान्स पाऊल देशात प्रथम उचलण्यात येत आहे. या सॅटेलाईटच्या दृष्टीने वैज्ञानिकांची नियुक्ती करुन आमचा विभाग अभ्यास करत आहे या वैज्ञानिकांकडून माहिती घेतल्यानंतर या सॅटॅलाइटमुळे कृषी विभाग ,वन विभाग आणि इतर विभागांचा यात कसा समावेश करता येईल या दृष्टीने विचार सुरू झाला आहे, त्यांनाही या जोडता येणार आहे.

ही सॅटेलाइट सुरू करण्यासाठी दीड- दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परवानगी घ्यावे लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader