बुलढाणा : समृद्धी महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातातील २५ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय काल रात्री घेण्यात आला होता. मात्र सामाजिक अडचणीमुळे अंत्यसंस्कार रखडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : हे काय! नागाने रंग बदलला; अर्धा पांढरा आणि…

आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास नियोजन असताना साडेदहा वाजेपर्यंत अंत्यसंस्काराचा तिढा सुटू शकला नाही. एक मृत अल्पसंख्याक समाजाची असल्याने नातेवाईक व स्थानिक धर्म बांधवांनी दफनचा आग्रह धरला. यावर कालपासून येथे तळ ठोकून असलेले गिरीश महाजन, आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड व अधिकारी यांनी विचारविनिमय केला. हा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cremation of buldhana bus accident victims delayed what is the reason scm 61 ssb