लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती: चिखलदरा नजीकच्या आमझरी गावाजवळ दरड कोसळल्याने चिखलदरा ते घटांग मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने इतर कुठलीही हानी नाही. दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आणखी वाचा-७९५ रुपयांमध्ये २० लाखांचा अपघात विमा; टपाल खात्याची योजना, जाणून घ्या सविस्तर…

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पोहचण्यासाठी परतवाडा येथून दोन मार्ग आहेत. बहुतांश पर्यटक धामणगाव गढी मार्गाचा वापर करतात. चिखलदरा येथे घटांग मार्गे देखील पोहचता येते. या मार्गावर चिखलदरापासून जवळच असलेल्या आमझरी या गावानजीक रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे.