राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मयूर जोशी विरुद्ध नोईंग गांधीजम ग्लोबल फ्रेन्ड्स ग्रुपने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली होती. विलंबानेच का होईना पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असून पोस्ट टाकणाऱ्या मयूर जोशीवर गुन्हा दाखल केला आहे.
मयूर जोशी याने फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत महात्मा गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या लाखो अनुयानांच्या भावना दुखावल्या. जोशींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची तक्रार संदेश सिंगलकर, प्रज्वला तट्टे आणि इतरांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली होती.
या तक्रारीला २४ तासांहून अधिक कालावधी लोटल्यावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. शेवटी पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत मयूर जोशीवर गुन्हा दाखल केला आहे.