वर्धा: सासू सुनेची भांडणे नवी नाहीत. एकाच घरात राहणाऱ्या असतील तर भांड्याला भांडे लागण्याची बाब नित्याचीच. तोंडाला तोंड देणे ठरलेलेच. मात्र या प्रकरणात डोक्याला डोके भिडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्थानिक सत्यदेव कॉलनीत बघेल परिवारात पती पत्नी, मुलगा सून व त्यांची दोन मुले एकत्र राहतात. यात मुलाला दूर करते, त्याला विरोधात भडकविते असा आरोप करीत चिडलेल्या सासू रमा बघेलने सून श्रद्धाच्या झिंझ्या उपटल्या. केस पकडून तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे सून जखमी झाली.

हेही वाचा… Talathi Recruitment : हायटेक उपकरणांसह अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरून एकाला अटक; पोलीस म्हणतात…

तिने पोलीसांकडे धाव घेतली. सासू व सुनेच्या मुलाचा वाद सुरूच होता. त्यात आपल्या मुलाला घेण्यासाठी सून गेली असताना सासूचा पारा भडकला होता. मग हातघाईवर आलेल्या सासूने तिथेच सुनेला मारायला सुरुवात केली. त्यातून पुढील रामायण घडले.