भंडारा: एका अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीला तब्बल सात वर्षांनंतर शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.
९ ऑक्टोबर २०१६ रोजी एका अज्ञात आरोपीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पवनी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या अनुषंगाने गुन्हा दाखल करून घटनेचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविण्यात आला होता.
हेही वाचा… कंपनीची १६ लाखांनी फसवणूक; विमान प्रवास, निवासाचे बनावट बिले सादर
या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या अल्पवयीन मुलीचा तपास सातत्याने सुरू ठेवला. तब्बल सात वर्षांनंतर अपहृत मुलीचा गुजरात राज्यातून शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.