नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी वाढली असून पोलिसांचा वचक संपला आहे. गुन्हेगाराने तोंड वर काढले असून गेल्या पाच दिवसांपासून दररोज एक हत्याकांड शहरात घडत आहे. गेल्या पाच दिवसांत पाच हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र समोर आले आहे. रविवारीसुद्धा जरीपटक्यातील ख्रिश्चन कबरस्थानात हत्याकांड घडले. रमेश शेंडे असे खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. यापूर्वी, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघांनी एकाचा चाकूने भोसकून खून करुन धंतोलीसारख्या गजबजलेल्या रस्त्यावर फेकून पळ काढला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांना अद्याप मृताची ओळख पटविण्यात यश आले नाही. तसेच अजनीत बापलेकाचा खून झाला होता तर शुक्रवारी कुलदीप चव्हाण नावाच्या युवकाचा मित्रानेच खून केला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी यशोधरानगरमध्ये वहिणीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राचाही राजा नावाच्या युवकाने खून केल्याची घटना समोर आली होती.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, केंद्रावर तणाव…

शहरातील हत्याकांडाचे सत्र वाढतच असून सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही पाच खुनांनी उपराजधानी हादरली. गेल्या पाच दिवसांत शहरात पाचवे हत्याकांड घडले. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक युवक हातात चाकू घेऊन जरीपटक्यातील भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कबरस्थान येथे आला. तेथील चौकीदार रमेश शेंडे याच्या दिशेने धावत गेला. त्याचा हात पकडून काहीतरी विचारणा केली. त्यानंतर चाकूने रमेश यांच्यावर वार केले. त्यावेळी कबरस्थानात अंत्यविधीसाठी आलेला युवक जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले.

तोपर्यंत रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहचवले तर आरोपीला किरण यांनी घट्ट पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला. हत्याकांडाबाबत माहिती दिली. काही वेळातच जरपीटकचे पोलीस निरीक्षक संजय सिंग तेथे पोहचले. त्यांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळ पंचनामा करुन हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…नागपूरकरांवर का आली ‘चिपको आंदोलना’ची वेळ

धंतोली हत्याकांडातील आरोपींना अटक

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हंपी यार्ड रोडवरील लोहारकर हॉटेलच्या समोर एका ऑटोने आलेल्या तीन आरोपींनी एका युवकावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ऑटोतून त्याला रस्त्यावर फेकले आणि पळ काढला. तासाभरानंतर पोलिसांना हत्याकांडाची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. हे हत्याकांड सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून आरोपींची ओळख पटविली. त्या ऑटोची माहिती पोलिसांनी काढली. या हत्याकांडातील तीनही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime has increased in nagpur murder occurring daily for past five days adk 83 sud 02