लोकसत्ता टीम

नागपूर : बीड जिल्ह्यातील घटनेचे धागेदोर मंत्र्यांपर्यंत आहेत. परभणीत पोलीस अमानुष वागले आणि त्यावर गृहमंत्री पांघरून घालण्याचे काम करीत आहेत. सरकार पाठीशी घालत असेल तर गुन्हेगारांची हिंमत वाढणारच, अशी टीका माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.

Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
62 percent of ministers in the state cabinet have criminal backgrounds print politics news
राज्य मंत्रिमंडळात ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
Vishwanath Baburao Chakote , Former MLA Complaint ,
काँग्रेसच्या माजी आमदाराची शेतजमीन भाऊ, पुतण्याने लाटली; सोलापुरात गुन्हा
Image of Mallikarjun Kharge And PM Narendra Moid.
Video : पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलल्याचा काँग्रेसचा आरोप; १३ मिनिटांच्या भाषणात मल्लिकार्जून खरगेंनी दिले प्रत्युत्तर
Laxman Hake, Chhagan Bhujbal And Ajit Pawar.
Chhagan Bhujbal : भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना सवाल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जी घटना घडली, त्याचे धागेदोरे मंत्र्यापर्यंत आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे याघटनेमागील ‘आका’ अजूनही बाहेर आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने तर बीड हे महाराष्ट्रातील बिहार असल्याचे पुस्तक लिहले आहे. दुसरीकडे परभणी पोलीस स्थानिकांशी अमानुषपणे वागले. त्यांना पाठीशी घालण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री करीत आहेत. अशाप्रकारे सत्ताधारी, मंत्री गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर अशा घडत राहतील, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…

मुंबई महापालिकेत आघाडी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा, विधानसभेत महाविकास आघाडीसोबत होते. सध्याची राजकीय स्थिती पाहून त्यांना स्वतंत्र लढायचे असेल तर तो त्यांचा निर्णय. पण, मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीने लढावे असे आम्हाला वाटते. त्यांना स्वतंत्र लढायचे असेलतर आमची देखील तयारी आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका वृत्त पत्रातून वाचतो. तरी देखील आम्हाला उद्धव ठाकरे स्वतंत्र निर्णय लढण्याबाबत पुर्नविचार करतील. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेत निवडणुकीला सामोरे जावू.

व्यापाऱ्यांना सरकारचा आशीर्वाद

सरकारचे धोरणे मोठ्या उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या माल वाटेल तेवढा खरेदीची भूमिका देणारे आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी मोठी गोदाम उभे केले आहे. सरकारच्या आशीर्वादाने व्यापारी लॉबी शेतमालाचे भाव पाडतात. हे व्यापारी शेतमाल निघतो तेव्हा स्वस्त दरात माल खरेदी करतात आणि साठवून ठेवतात. काही महिन्यांनी वाढीव दराने माल विकतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. आता अदानींसारख्यांच्या मोठ्या कंपन्यात शेतमाल खेरदीत उतरल्या आहेत. आहेत. शेतकऱ्यांनी पिकांवर लावलेल्या खर्च देखील निघत नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था करण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा-मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…

त्यांनी जे पसरले तेच उगवले

भाजपला खोट्या आणि संपादीत केलेल्या चित्रफित किंवा पोस्टचा त्रास होत आहे. पण, याची सुरुवात त्यांनीच केली. काँग्रेस पक्षाची, त्यांच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी समाज माध्यमांवर खोट्या, मोडतोड केलेल्या चित्रफीत, पोस्ट भाजपने प्रसारित केले. त्यांनी जे पेरले ते आता उगवत आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Story img Loader