लोकसत्ता टीम

नागपूर : अतिरिक्त मतदान यंत्र ‘स्ट्रॉंग रुम’मध्ये घेऊन जात असताना शासकीय वाहनाची तोडफोड करणे आणि वाहन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यासमोर आज गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Kondhwa police station, women police beaten ,
कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

बुधवारी सायंकाळी मतदान अधिकारी मतदान केंद्रावर अतिरिक्त असलेले मतदान यंत्र परत घेऊन जात होते. झेंडा चौकात एक अधिकारी काही कागदपत्र घेऊन झेरॉक्स केंद्रावर गेल्याने वाहन थांबविण्यात आले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाहनात मतदान यंत्र दिसले. त्या कार्यकर्त्यांना गैरसमज झाला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मतदान यंत्राबाबत जाब विचारला.

आणखी वाचा-‘एनडीपीएस’ कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर तरुण पिढी उद्धवस्त होईल, उच्च न्यायालयाकडून सत्र न्यायालयाची कानउघाडणी…

दरम्यान, तेथे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके पोहचले. मतदान यंत्र सील न करता नेण्यात येत असल्याचा आरोप करुन काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शासकीय वाहनांची तोडफोड केली आणि वाहनचालकाला मारहाण केली. त्यावेळी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहचले.

काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यात भाजप कार्यकर्ता निखिल गाडगीळ किरकोळ जखमी झाला. त्यामुळे तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस सहआयुक्त निसार तांबोळी स्वत: घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यामुळे वाद निवळला. मात्र, शासकीय वाहनाची तोडफोड आणि वाहनाचालकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी बंटी शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-बलात्काराच्या गुन्ह्यात अडकण्याच्या भीतीपोटी केला प्रेयसीचा खून

कोतवालीत तणावपूर्ण शांतता

उमेदवार बंटी शेळके यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपर्यंत कार्यकर्ते ठाण्याबाहेर उभे होते. शेळकेंवर गुन्हा दाखल झाल्यामुळे आज गुरुवारीसुद्धा महाल-झेंडा चौकात तणावपूर्ण शांतता होती. तसेच लकडगंज पोलिसांनी बुधवारी रात्री शैलेष नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्या प्रकरणानंतरही लकडगंज पोलीस ठाण्यावर शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव आला होता. पोलिसांनी खबरदारी म्हणून कोतवाली, लकडगंज, तहसील, किल्ला मार्ग, झेंडा चौक, महाल या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांची तोडफोड केली. तसेच वाहनचालकाला मारहाण केली. हे प्रकरण खूप गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करण्यासह अन्य कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. चित्रफितींच्या आधारे आम्ही या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल. -महक स्वामी (पोलीस उपायुक्त)

Story img Loader