अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून शेगाव येथील सराफा व्यावसायिकाला अटक करून स्थानिक गुन्हे शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भंडारा: चप्राड टेकडी मंदिर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; दोन श्वान केले फस्त

शेगाव येथील सराफा व्यवसायी श्याम धनराज वर्मा (४०) यांना ९ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास अकोला स्थानिक गुन्हे शाखेतील नितीन चव्हाण, पोलीस कर्मचारी शक्ती कांबळे, संदीप काटकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. अकोला ‘एलसीबी’ कार्यालयात आणून पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अमानूष मारहाण केली व नग्न करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी वर्मा यांनी १८ जानेवारीला पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडेसुद्धा धाव घेऊन तक्रार केली. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तक्रारदार श्याम वर्मा यांनी सीआरपीसी १५६ (३) नुसार पोलिसांविरूद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे शहर कोतवाली पोलिसांना आदेश दिले. त्या आदेशानुसार शहर कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरूद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.