लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : कृषी विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी तळोधीत एका मालवाहू वाहनातून १८ लाख ९७ हजार रुपये किमतीचा ७५९ किलो चोरबिटीचा साठा जप्त केला.

आदल्या दिवशी गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथून ४२ हजार रुपयांचा साठा पथकाने जप्त केला होता. दोन दिवसांत वीस लाखांच्यावर चोरबिटीचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : पत्नीस जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप

तेलगंणा राज्यातून तसेच सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात चोरबिटीचा साठा जिल्ह्यात येत असल्याची वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनीसुद्धा भरारी पथकाला कारवाई करण्याचा दम दिला होता. यामुळे भरारी पथकाच्या कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी प्रकाश शिवदास वन्नेवार, रेणुका बाबू यादलापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes against three for smuggling chorbiti seeds rsj 74 mrj
Show comments