लोकसत्ता टीम

बुलढाणा : एका परिवाराला बेदम मारहाण होत असल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर अट्टल गुन्हेगाराने आधी दगडफेक व नंतर धारधार तलवारीने वार केला. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. या चकमकीत अंधाराचा फायदा घेत अट्टल गुन्हेगार व्यक्ती पसार होण्यात सफल झाला. या घटनेत संभाव्य भीषण दुर्घटना टळली असून तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहे.

Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
2 arrested for firing in Theur
थेऊर गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी अटकेत

सामाजिकदृष्टया संवेदनशील असलेल्या मलकापूर शहरातील मुक्ताई नगर मार्ग लगतच्या म्हाडा वसाहत मध्ये शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी मध्य रात्री उशिरा हा थरारक घटनाक्रम घडला आहे. यामुळे मलकापूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक म्हाडा कॉलनीतील रहिवासी मनोजसिंह टाक हा तडीपार व कुख्यात गुन्हेगार आहे. तो शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी मलकापूर शहरात दाखल झाला.

आणखी वाचा-चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

म्हाडा वसाहतमध्ये राहणाऱ्या टाक याने रात्री उशिरा घरात डुक्कर येतात या क्षुल्लक कारणावरून त्याच परिसरातील बामंदे कुटुंबीयांसोबत वाद घातला. या वादाचे पर्यवसन भीषण हाणामारीत झाले. आरोपी टाक याने बामंदे परिवारातील पती-पत्नी वर हल्ला चढविला. लोखंडी रॉड तथा तलवारीचा वापर करीत त्यांना गंभीररीत्या जखमी केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मलकापूर शहर पोलीस ठाण्याला काही नागरिकांनी दिली. घटनेचे गांभीर्य आणि टाक याचे कारनामे माहीत असल्याने मलकापूर शहर पोलिसांचे ‘डीबी’ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने आधी गंभीर जखमी बामंदे पती-पत्नीला उपचारार्थ उप जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना केले. या धामधुमीत मनोजसिंह टाकची पत्नी विटेच्या सहाय्याने स्वतःचे डोके फोडण्याचा प्रयत्न करीत होती, अशी माहिती आहे. हा प्रकार झाडाझुडपात लपलेल्या मनोजसिंह टाक च्या लक्षात येताच त्याने प्रारंभी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता त्याने सरळ तलवार हातात घेऊन पोलिसांच्या दिशेने चाल केली. एवढ्यावरच न थांबता पोलिसांवर तलवारीने हल्ला केला.

आणखी वाचा-अमरावती : रुग्‍णवाहिका वेळेवर न मिळाल्‍याने माता, अर्भकाचा मृत्‍यू; मेळघाटातील दुर्दैवी घटना

सुदैवाने दक्ष असलेल्या पोलिसांनी त्याचा हा प्राणघातक हल्ला चुकविला. आरोपी बेफाम असल्याने तो पुन्हा हल्ला करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याच्या हल्ल्यापासून बचावासाठी ( स्वरक्षणासाठी) एकापोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जवळील अग्नी शस्त्राने आरोपीला धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. हवेत दोनदा गोळीबार केला. मात्र तो आरोपी नियंत्रणात येत नसल्याने अखेर नाईलाजास्तव त्या कर्मचाऱ्याने आरोपीच्या दिशेने कमरेखालील भागात पायाकडे गोळी झाडली. जवळपास तीन गोळ्या झाडण्यात आल्या.

निर्भय पोलिसांच्या तिखट प्रतिकाराने टाक याचे अवसान गळाले. यामुळे भेदरलेल्या टाक याने रात्रीच्या अंधाराचा व झाडाझुडपांचा फायदा घेत आणि स्वतःची पत्नी व मावशीच्या सहकार्याने घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी आरोपी मनोजसिंह टाक ची पत्नी, त्याची मावशी, मावशी चा मुलगा व भावाचा मुलगा सुद्धा घटनास्थळी हजर होते. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वरगे, पोलीस उप निरीक्षक सुनील भुसळे, पोलीस कर्मचारी नासिर व मतीन किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून तात्काळ पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना घटनेची माहिती देण्यात आली. यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक म्हाडा वसाहत परिसरात पाठविण्यात आली.

आणखी वाचा-नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान

दरम्यान आज रविवारी, १ सप्टेंबर रोजी घटनास्थळी आणि मलकापूर पोलीस ठाण्यात बुलढाणा, खामगाव व अन्य ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी (मलकापूर ) गवळी, मलकापूर शहरचे ठाणेदार आणि डीबी पथकातील कर्मचारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.तसेच तपासा च्या दृष्टीने सूचना, निर्देश दिले. दुसरीकडे पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे काल ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले आहे.काल त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडला. त्यांच्या जागी विश्व पानसरे हे बदलून येणार आहे. मलकापूर मधील थरारक घटना त्यांना एक प्रकारे सलामी असल्याची मजेदार चर्चा होत आहे.

Story img Loader