वर्धा : नागरिकांना त्राहीमाम करून सोडणारा कुख्यात गुन्हेगार दीक्षित उर्फ गुठली मिलिंद भगत याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अवैध दारुविक्री सोबतच शस्त्राच्या धाकावर जरब बसविणे, खुनाचा प्रयत्न, गुंडांना सोबत घेत हल्ला करणे अश्या स्वरुपाचे विविध १९ गुन्हे त्याच्यावर २०१६ ते २०२३ दरम्यान दाखल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा: रायपूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले, नदीला पूर,भाविकांची वाहने अडकली

हेही वाचा – भरती प्रक्रियेतून शासनाला सुमारे २६५ कोटींचा महसूल; सामान्य विद्यार्थ्यांच्या लुटीचा आरोप

दीक्षितला एकदा तडीपार करतानाच अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती. पण तरीही त्याची गुन्हेगारी सुरूच होती. अलीकडेच गुठलीने जबरी चोरीचा गुन्हा केला होता. अखेर त्याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या विरोधात एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार झाला. अखेर तो मंजूर करण्यात आला. त्याला अटक करून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई हिंगणघाटवासियांना दिलासा देणारी ठरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal dixit alias guthli milind bhagat sent to nagpur jail pmd 64 ssb
Show comments