Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years : गेल्या काही वर्षांमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल झालेले आहेत. या क्षेत्रात आपल्याला अनपेक्षित असे अविष्कार पाहायला मिळत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हेदेखील यापैकीच एक आहे. दरम्यान, या क्षेत्रात वेगवेगळे बदल झाल्यामुळे त्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच विशिष्ट चौकट ठरवून देण्यासाठी सर्वसमावेशक नियमांची गरज व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते.
मोठ्यांसोबतच मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आणि…
विविध यंत्रणा आणि संस्थांकडून पसरवलेला विकृत प्रचार आणि वाईट मूल्ये भारतातील नवीन पिढीच्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर वाईट परिणाम करत आहेत. मोठ्यांसोबतच मुलांच्या हातातही मोबाईल पोहोचला आहे, तिथे काय दाखवलं जातं, मुलं काय पाहत आहेत, यावर फारसा नियंत्रण नाही. साहित्याचा उल्लेख करणे म्हणजे सभ्यतेचे उल्लंघन होईल, हे अत्यंत घृणास्पद आहे. आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात आणि समाजात जाहिराती आणि विकृत दृक-श्राव्य सामग्रीवर कायदेशीर नियंत्रणाची नितांत गरज आहे. तरुण पिढीमध्ये वणव्यासारखी पसरत चाललेली अमली पदार्थाची सवय समाजालाही आतून पोकळ करत आहे. चांगुलपणाकडे नेणाऱ्या मूल्यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.
हेही वाचा – नागपुरात लोटला भीम सागर, निळ्या रंगाच्या सम्यक पताकांनी सजली दीक्षाभूमी
महिलांचा सन्मान हवा
स्त्रियांकडे पाहण्याचा चांगला दृष्टीकोन ही आपली सांस्कृतिक देणगी आहे. जी आपल्याला आपल्या सांस्कृतिक परंपरेतून मिळते. याचे भान नसणे, ज्या कुटुंबांतून आणि ज्या माध्यमांतून समाजाला केवळ करमणूकच नाही तर ज्ञानप्राप्तीही होत आहे, त्या माध्यमांतून या मूल्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा अनादर करणे हे जाणूनबुजून किंवा नकळत खूप महागात पडते आहे. कुटुंब, समाज आणि प्रसारमाध्यमांद्वारे ही सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याची व्यवस्था पुन्हा जागृत करायची आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेमकं काय म्हणाले भागवत?
सोशल मिडीयाचा वापर समाजाला जोडण्यासाठी केला जातो, तो तोडण्यासाठी नाही तर सुसंस्कृत बनवण्यासाठी आणि वाईट संस्कृती पसरवण्यासाठी नाही याची काळजी सर्व सज्जनांनी घ्यावी. मात्र आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींमूळे समाज बिघडत चालले आहे. कायद्याच्या चौकटीत आणने आवश्यक आहे असे आवाहन सरसंघचालक डॉ भागवत यांनी केले.