वर्धा : कंत्राटदारास शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार दादाराव केचे यांच्यावर टीका होत असून, ‘मंत्रिपदासाठी दावेदारी करणाऱ्या आमदारास लोकांना शिवीगाळ करणे शोभते काय’, अशी विचारणा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्वी तालुक्यातील एका गावातल्या भूमिपूजनास बोलावले नाही म्हणून आमदार दादाराव केचे यांनी संंबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ केल्याचा, तसेच मारायला धावण्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर चांगलीच गाजली. याच घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहे. आज वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत भावना व्यक्त केल्या. यानंतर माध्यमांसोबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी स्पष्ट केले की, भूमिपूजनाचा कार्यक्रम घेणे आम्हाला बंधनकारक नाही. आमदारांनी कामाचे पैसे न देण्याची धमकी दिली. हे शोभनीय नाही. पदाधिकारी व नगरसेवक मुन्ना झाडे यांनी एकीकडे मंत्रिपदासाठी दावेदारी करणाऱ्या केचेंना शिवीगाळ करणे शोभते का, असा प्रश्न केला.

हेही वाचा – व्यवसायासाठी अर्थसाहाय्य न घेताही बँकेने लावले दुकानास ‘सील’!

हेही वाचा – लोकसत्ताच्या बातमीनंतर प्रदूषण कंट्रोल बोर्डाला आली जाग, डांबर प्लांटमधील प्रदूषित धुरामुळे अनेकांना त्वचारोग

कंत्राटात केवळ भूमिपूजनाचा फलक लावून देण्याचे नमूद आहे. मात्र आमच्यावरच खर्च लादल्या जातो. यांच्या जाहिरातबाजीचा, चहापाण्याचा खर्चही आम्हीच करतो. खंडीभर नारळ आणून ठेवावे लागतात. तुम्ही तुमच्या पैशाने मोठेपणा दाखवा, आम्हीच खर्च करायचा व आम्हीच शिव्याही खायच्या का, असा संतप्त सवालही झाडे यांनी केला आहे. दरम्यान, हे प्रकरण चांगलेच पेटणार, अशी लक्षणे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criticism against mla dadarao keche over use of abusive language pmd 64 ssb