नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात दररोज हत्या, बलात्कार, दंगली घडत आहेत. विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून शिंदे-फडणवीसांचे जंगलराज सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाच्या रँकिंगबद्दल काय म्हणाले? केल्या ‘या’ सूचना

पटोले म्हणाले, राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? राज्याला गृहमंत्री आहेत का? असे प्रश्न पडावेत इतकी भयावह अवस्था आहे. राज्याच्या विविध भागांतून दररोज खून, बलात्कार, दरोडे, दंगली, विरोधकांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा शहरांमध्ये दंगली झाल्या. दररोज वेगवेगळ्या शहरांत तणावाच्या घटना घडत आहेत. सत्ताधारी पक्षांकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केले जात असून, जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पहात बसले आहेत. गुंड आणि समाजकंटक दररोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे काढत आहेत, असा संतापही पटोलेंनी व्यक्त केला.

Story img Loader