लोकसत्ता टीम
वाशीम : आज १५ फेब्रुवारी रोजी वाशीम शहरासह काही भागात पावसाने हजेरी लावली. कुठे वादळी वाऱ्यांसाह तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आणखी वाचा-Video : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटक वाहनांनी अडवली वाघाची वाट
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात दिवसा कडक ऊन पडत आहे. मात्र आज १५ फेब्रुवारी रोजी दुपार नंतर अचानक वातावरण बदलून वाशीम शहरांसाह काही भागात पावसाने हजेरी लावली. यावर्षी खरीप हंगामात पावसाने साथ न दिल्याने मोठया प्रमाणावर उत्पादन घटले. त्यातच पिकावर पडलेली कीड शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे. आता पुन्हा पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.