अकोला : अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंतच्या सर्वेक्षणात एक लाख ४२ हजार ७५२ हेक्टर आर. शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यात या महिन्यात १३, १९, २२ व २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीने बाधित झाली.

आपत्तीमुळे तीन व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे पाच गावांत बचाव कार्य करण्यात आले. एनडीआरएफ, तसेच स्थानिक बचाव पथकाने पुरामुळे अडकलेल्या ३० व्यक्तींना सुरक्षितस्थळी पोहोचविले. २४८ कुटुंबाना सानुग्रह मदत देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा >>> देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; गोंदियाच्या ठगबाजावर ‘मनी लाँडरिंग’चा गुन्हा

आतापर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार एक लाख ३७ हजार ६७८ हेक्टर आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तसेच पाच हजार ७४ हेक्टर आर. शेतजमीन खरडून गेली. अतिवृष्टीत पशुधनातील १५ दुधाळ व आठ लहानमोठी अशी २३ जनावरे दगावली. जिल्ह्यातील १० रस्ते व पाच पूल अशा १५ पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.