गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून यामुळे सात तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मेहकर व लोणार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यंदाचा नियमित पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात खरीप पिकांचे नुकसान करणारा ठरला. याउपरही खरीप पिके तग धरून होती. जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबीनवर लाखो शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून असताना ऑक्टोम्बरमध्येदेखील पावसाचे थैमान कायम आहे. मागील आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस व ढगाळ वातावरण पिकांसाठी मारक ठरत आहे.
हेही वाचा >>>नागपूर : तरुणीने करमत नसल्यामुळे कंटाळून घेतला गळफास
परतीच्या पावसात अतिवृष्टी!
परतीच्या पावसात अतिवृष्टी हे दुर्मिळ चित्र मेहकर व लोणार तालुक्यात अनुभवाला मिळाले. १० ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजतापर्यंत (२४ तासांत) मेहकर तालुक्यातील मेहकर व नायगाव महसूल मंडळात प्रत्येकी १०७.५ मिलीमीटर इतका कोसळधार पाऊस झाला. लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळाला १०५ मिलीमीटर इतक्या धोधो पावसाने झोडपून काढले. यामुळे उभी पिके अक्षरशः आडवी झाली.
हेही वाचा >>>नागपूर : मंदिरात दर्शन घेत माफी मागितली आणि हनुमानाची गदा घेऊन पसारही झाला
जिल्ह्यात ९५ टक्के पाऊस परतीच्या पावसाने १३ तालुक्यातील पावसाची आकडेवारीदेखील सुधारली आहे. बुलढाणा व देऊलगावराजा प्रत्येकी १०७ मिमी, सिंदखेडराजा १०४, मेहकर १००, शेगाव १०१, संग्रामपूर १०४ या तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित ७ तालुक्यात ८० ते ९८ टक्केदरम्यान पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ( ७६१. ६ मिमी) तुलनेत आजअखेर ७२२ मिमी( ९४.८८ टक्के) इतका पाऊस बरसला.
हेही वाचा >>>नागपूर : शरीरसंबंधास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची मैत्रिणीला धमकी
दुसरीकडे, अतिवृष्टीमुळे ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान म्हणजे केवळ ३ दिवसातच तब्बल १९ हजार ६५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, उडीद या पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील २७ गावातील ११०३५ हेक्टरवरील तर लोणार तालुक्यातील ५ गावांतील ८०३० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.