लोकसत्ता टीम
चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वादळी वारा, विजेचा कडकडाट, गारपिटीसह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या हरभरा, मक्का, ज्वारी व मिरची या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारीसुध्दा चंद्रपूरात सायंकाळी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती.
आणखी वाचा- निवडणूक लागली, शस्त्रे शासनाकडे जमा करण्याची वेळ झाली!
हवामान विभागाने सोमवारपासून तीन दिवस चंद्रपूरला ऑरेज अलर्ट दिला होता. पूर्व विदर्भात गारपीठ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. सोमवारला सायंकाळी ५ वाजता अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. सोमवारी आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले नव्हते. मात्र, आज मंगळवारी दुपारी २.३० वाजता आलेल्या गारपिटीसह अवकाळी पाऊसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, ज्वारी, मक्का यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरपना तालुक्यात गारपीट झाली आहे.