नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत आमच्या पक्षाचे एकही मत फुटले नाही तर काँग्रेसचीच मतं फुटली आहे. त्याचे विश्लेषण सुरू असून संबंधित गद्दार आमदारांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल देशमुख नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मतदान करण्याचा फॉरमेट ठरला असताना काही काँग्रेसच्या आमदारांनी गद्दार होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यांची नावे समोर आली. आमच्या पक्षातील मात्र एकही आमदार फुटला नाही. जयंत पाटील यांना आमच्या पक्षाची सर्व मते मिळाली असल्याचे देशमुख म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमचा एक उमेदवार पराभूत झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत मात्र आम्ही महाविकास आघाडी मिळून एकत्र लढणार असून २२५ च्यावर जागा जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शनिवारी देशभरात झालेल्या पोटनिवडणूक इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. जिथे जिथे आम्ही सर्व सोबत लढत आहे तिथे यश मिळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला यश मिळेल असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा : २१ वैद्यकीय महाविद्यालयांत २४४ कोटींच्या खर्चातून ‘डिजिटल फिजियोलॉजी प्रयोगशाळा’, हा लाभ होणार ..

नागपुरात विधासभेच्या निवडणुकीसाठी आम्ही तीन जागेची मागणी केली आहे आणि ग्रामीण मध्ये दोन आहेत. उमरेडसाठी आम्ही आग्रही आहे. तसेच शहरात दोन जागेवर आग्रही असणार आहे. यापूर्वी कधीही उमेदवारी घेतली नाही, आता मात्र आघाडीतील मित्रपक्षाशी चर्चा करुन आम्ही शहरात किमान दोन आणि ग्रामीणमध्ये दोन जागा लढवणार आहे.

मनोज जरांगे यांनी आंदोलनात केलेली मागणी आणि ओबीसीची मागणी याबाबत दोन्ही समाजाला एकत्र आणून सरकारने चर्चा केली पाहिजे मात्र दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे असा आरोप त्यांनी केला. जे मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला आश्वासन दिले त्या बाबत दोघांशी चर्चा करून सरकारने निर्णय घ्यावा असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा : उपराजधानीत ड्रग्स तस्करांचा पुन्हा सुळसुळाट, कुरिअरने मागविले…

बच्चु कडू आणि काही अपक्ष आमदार तिसरी आघाडी निर्माण करत असले तरी त्यांचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आघाडी कोणीही निर्माण करु शकते मात्र त्यात यश येईलच असे नाही. शेतकरी संबंधी मागण्या आमच्यापण आहे. कापूस सोयाबीनला भाव मिळावा यासाठी आम्ही लढत आहे असेही देशमुख म्हणाले. बच्चू कडू यांना महाविकास अघाडीसोबत यायचे की युतीत जायचे की ,स्वतंत्र लढायचे हा त्यांचा प्रश्न आहे असेही देशमुख म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ करोड युवकांना रोजगार देऊ मात्र १० वर्षात किती लोकांना रोजगार दिला. युवकांना गुमराह करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.राज्यात येणारे अनेक उद्याग गुजरातमध्ये नेण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cross voting from only congress mla s in maharashtra legislative council elections says ncp leader anil deshmukh vmb 67 css