बुलढाणा: संतनगरी शेगाव गजानन महाराजाच्या पावन वास्तव्याने पुनीत नगरी आहे. त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संतनगरीत आज गर्दी केली होती.
आज सोमवारी आलेल्या गुरुपौर्णिमा निमित्त शेगाव येथे राज्यातील भाविकांचे आगमन झाले. गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शनासाठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. भाविकांनी आपली इच्छा श्री गजानन महाराज चरणी प्रगट केली. त्यामुळे शेगावात व गजानन महाराज मंदिर परिसर भाविकांनी नुसता फुलून गेला. हजारो भक्त समाधीस्थळी नतमस्तक झाले.
हेही वाचा… नागपूर: पावसाळ्यात ‘व्हायरल इंफेक्शन’चा धोका दुप्पट… डॉक्टर काय म्हणतात?
परिसरातील मलकापूरसह इतर ठिकाणाहून पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगाव दाखल झाल्या. शेगावला पायी वारी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. आजही त्याचा प्रत्यय आला. अनेक भाविकांनी विजय ग्रंथाचे पारायण केले.