बुलढाणा : विदर्भ पंढरी शेगाव येथे आज बुधवारी गजानन पुण्यतिथी सोहळा (ऋषिपंचमी निमित्त) भाविकांची मांदियाळी जमली. विदर्भासह राज्यातील अन्य भागांतून शेकडो दिंड्या दाखल झाल्याने मंदिर परिसर व रस्ते आबालवृद्ध भाविकानी फुलल्याचे दिसून आले. श्री गजानन महाराज यांनी ११३ वर्षांपूर्वी तिथीनुसार ऋषिपंचमीला संजीवन समाधी घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त ऋषिपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात संतनगरी शेगाव येथे साजरा केला जातो. यानिमित्त संतनगरीत जिल्ह्यासह राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली. दोन दिवसांपासून दिंड्या दाखल होत असून आज सकाळपर्यंत सुमारे साडेचारशे दिंड्या दाखल झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – Talathi Exam Result : तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…

गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने १६ सप्टेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी भारतबुवा म्हैसवाडीकर यांचे ‘श्रीं’ च्या समाधी सोहळ्यावर कीर्तन पार पडले. सोळा तारखेपासून सुरू असलेल्या गणेशयाग व वरुण यागाची पूर्णाहुती देण्यात आली. आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली. सकाळी चार वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा – भारतात गोसेवा व गोरक्षण समजून सांगावे लागत आहे, हेच वेदनादायी; संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची खंत

संजीवनी समाधी

गजानन महाराजांनी ११३ वर्षांपूर्वी आठ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन समाधी घेतली. तिथीनुसार तो ऋषिपंचमीचा दिवस होता. त्यानिमित्त दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी पुण्यतिथी सोहळा पारंपरिक पद्धतीने व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of devotees in shegaon on the occasion of rishi panchami scm 61 ssb