गोंदिया: ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण असलेला ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ख्रिसमसनिमित्त गोंदिया शहरातील मेथोडीस चर्च, मार्टिन चर्च, ख्रिस्तानंद चर्च, निर्मल शाळा अशा विविध चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुधवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सुमारे १० हजार ख्रिस्ती समाज बांधवांनी सहभाग घेतला.

येशू ख्रिस्तांचा जन्म २५ डिसेंबरला झाला. त्यामुळे हा दिवस ख्रिस्ती बांधव ख्रिसमस (नाताळ) म्हणून साजरा करतात. गोंदिया शहरात इतर समाज बांधवांपेक्षा ख्रिश्चन बांधवांची संख्या कमी असली तरी येथे लहान- मोठी असे ५ चर्च आहेत. गेल्या ५ दिवसांपासून शहरात ख्रिसमसची तयारी सुरू असून ख्रिश्चन बांधवांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा उभारण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर

हेही वाचा… शेतमाल खरेदीत हिंगणघाट बाजार समिती अव्वल, तब्बल ११ लाख क्विंटलची खरेदी

ख्रिसमससाठी सांताक्लॉजच्या टोप्या, ड्रेस ,ख्रिसमस ट्री व इतर सजावटीच्या साहित्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. पन्नास रुपयांपासून ते शंभर, दोनशे रुपये किंमतीपर्यंतच्या या टोप्या आहेत. ख्रिसमसनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा… नक्षल्यांनी झाड तोडून भामरागड – आलापल्ली मार्ग अडवला; दक्षिण गडचिरोलीत काही ठिकाणी फलक लावले

ख्रिसमसनिमित्त ख्रिस्त बांधवांच्या घरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. शहरातील चर्चमध्ये २५ डिसेंबरला नाताळा निमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहे. अन्य चर्चमध्ये देखील ख्रिसमसनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संपुर्ण विश्वात साजरा करण्यात येणाऱ्या या सण विषयी लहान विद्यार्थ्यांना माहिती व्हावी करिता विविध शाळेत पण नाताळ हा सण साजरा करण्याची तयारी सुरू आहे. यात चिमुकले स्वत: सांताक्लॉजच्या वेषात शाळेत जातात याचे सुद्धा प्रशिक्षण काही शाळेत सुरू आहेत.