वर्धा : विविध प्रसंगात सजावट, भेट, पूजेसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. या फुलात अग्रभागी गुलाब असला तरी त्याची महागडी किंमत अनेकांना परवडत नाही. आता त्यास तोड म्हणून कार्नेशन हे फुल बाजारात चर्चेत आहे. विविध रंगात ते उपलब्ध होत असून प्रामुख्याने बिहार प्रांत या फुल उत्पादनात आघाडीवर आहे.
पुष्पगुच्छ तयार करण्यात याचा प्रामुख्याने उपयोग होतो. मात्र या फुलाची लागवड सोपी नाही. कारण तापमान कमी असावे लागते. त्यामुळे शेड नेट पद्धत यासाठी सोयीची ठरते. प्रामुख्याने ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान लागवड केल्या जाते. सर्व सोयी असणारे शेतकरी जुलै अखेरीस लागवडीस सुरवात करून टाकतात.
हेही वाचा – बडनेरात आहे १३५ वर्षे जुनी पारशी अग्यारी! जाणून घ्या महत्व….
प्रती चौरस मीटर पंधरा दिवसांच्या अंतराने चारशे ग्राम रासायनिक खत आवश्यक ठरते. फुले तोडण्याचे काम फार काळजीपूर्वक करावे लागते. कारण फुलाच्या दर्ज्यावर त्याची किंमत ठरत असते. गुलाबसारखी दिसणारी ही फुले बाजारात चांगलाच भाव खाऊन आहेत.