चंद्रपूर : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार, १ मार्च रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीमती भोसले यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मराठी चित्रपट, रंगभूमी, मराठी कलावंत यांच्या भेटीतून या विभागासाठी आणखी नवीन काय काय गोष्टी करता येईल, या विषयी चर्चा केली जात आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते, कलावंत, पार्श्वगायक, गायिका यांच्या ही भेटी ते घेत आहेत.

हेही वाचा – वर्धा: मलब्यात दबून दोघांचा मृत्यू, तीन सुखरूप

हेही वाचा – पूर्व विदर्भात डेंग्यूचा डंख.. या जिल्यात रुग्ण जास्त..

बुधवारी त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची भेट घेत यावेळी त्यांना सरस्वती मातेची प्रतिमा व बोलका तिरंगा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. कला, साहित्य आणि सांस्कृतिक विषयावर यावेळी त्यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural minister sudhir mungantiwar meet playback singer asha bhosale in mumbai rsj 74 ssb