बहुचर्चित आणि सात वर्षात तीन सरकारचा स्पर्श झालेल्या नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने शिंदे- फडणवीस सरकारने मोठा ‘ इव्हेंट’ साजरा केला. ठिकठिकाणी भगवे झंडे, पताका, स्वागत फलक, कटाऊटस लावून वातावरण निर्मिर्ती करण्यात आली. यातील काही कटाऊटस लक्ष वेधणारे होते. मात्र त्याची कारणे वेगळी होती.
हेही वाचा- नागपूर: पंतप्रधानांनी हिरवी झेंडी दाखवताच मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावर आनंदी आनंद
समृध्दी महामार्गाच्या उद्घघाटनस्थळी जाणाऱ्या मार्गावर ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कटाऊट लावण्यात आले होते. मात्र ते लावताना अग्रक्रम देण्यात आला तो मोदींना. शेवटचा क्रम होता तो शिवसेनाप्रमुखांच्या कटाऊटचा. खरं म्हणजे त्यांच्याच नावाने समृध्दी महामार्गाचे ओळखला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या स्थानी त्यांचेच कटाऊट अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याचे कटाऊट मोदी, फडणवीस, शिंदे यांच्यानंतर होते. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांचेच कटाऊट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर लावण्यात आले होते. त्यामुळे या कटाऊटची चर्चा जोरात आहे.