नागपूर : देशात चार वर्षांत सायबर गुन्हेगारीत पाचपट वाढ झाली आहे. देशभरातील २९ हजार बँक खात्यातून तब्बल १ हजार ४५७ कोटी रुपये सायबर गुन्हेगारांच्या घशात गेले. ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत यातील पाच टक्क्यांपेक्षा कमी गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सायबर गुन्हेगारांचे देशभरात जाळे पसरले असून अनेक राज्यातील उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी आहेत. दिल्ली, जामतारा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, नोएडा, कोलकाता आणि पंजाबमधील या टोळ्यांनी पोलिसांनाही जेरीस आणले आहे. सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६६ राष्ट्रीयकृत, खासगी बँकांच्या हजारो ग्राहकांच्या खात्यातून कोट्यवधी रुपये परस्पर काढले.

Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
Ulhasnagar Circle 4 police solved 180 crimes returning 65 lakh rupees to complainants
६५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांची कामगिरी, १८० गुन्ह्यांची उकल
anti narcotics squad arrest rajasthan youth in kharadi area for selling opium
अफू विक्री करणारा गजाआड; राजस्थानातील तरुणाकडून दोन लाखांची अफू जप्त
crime decrease in limits of Pimpri Chinchwad Police Commissionerate
पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यात घट वर्षभरात १६ हजार गुन्ह्यांची नोंद; गतवर्षीपेक्षा ५६८ ने घटले गुन्हे
Man robbed near Pune railway station
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार

आणखी वाचा-सदरमध्ये सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरमध्ये ‘सेक्स रॅकेट’

२०१९-२० मध्ये देशभरात १२९ कोटींची फसवणूक करण्यात आली. त्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम गमावणाऱ्या २६७७ बँक ग्राहकांचा समावेश आहे. २०२०-२१मध्ये ११९ कोटींची फसवणूक झाली. त्यात २५४५ नागरिकांची एका लाखापेक्षा जास्त रक्कम गमावली. २०२१-२२ या वर्षात १५५ कोटींची फसवणूक झाली. यावर्षी फसवणूक झालेल्यांमध्ये ३५९६ लोकांचा समावेश आहे. २०२२-२३ या वर्षात २७७ कोटींची फसवणूक झाली. त्यात ६६९९ जणांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला. २०२३-२४ मध्ये सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करुन १४५७ कोटी रुपयांनी फसवणूक केली. त्यात एक लाखांपेक्षा जास्त रक्कम गमावणाऱ्यांची संख्या २९ हजार १८२ एवढी आहे.

आणखी वाचा-राज्यात गारठा वाढणार, नागपूर १० अंश सेल्सिअसवर..

सेक्स्टॉर्शन, लिंक फ्रॉडचा वापर

सायबर गुन्हेगारांनी देशभरात सेक्स्टॉर्शन, ॲप डाऊनलोड फ्रॉड, लिंक फ्रॉड, इत्यादींच्या माध्यमातून २७७ कोटी रुपयांची फसवणूक केली. ६ हजार ६९९ एवढ्या जणांची एका लाखांपेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक करताना सायबर चोरट्यांनी क्रेडिट कार्ड, एटीएमचा पासवर्ड किंवा भ्रमणध्वनीवर ताबा मिळवला.

आतापर्यंत सायबर गुन्हेगारांच्या काही टोळ्यांचा भंडाफोड झाला आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येते. आमचे सायबर पोलीस ठाणे याबाबत दक्ष असते.-लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, सायबर शाखा, नागपूर.

Story img Loader