लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: व्हिडिओ लाईक केल्यास पैसे देण्याच्या नावावर मोठी रक्कम गुंतविणाऱ्यांची सायबर गुन्हेगार नागरिकांची लाखो रुपयांनी फसवणूक करीत आहेत.

आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे पुढे आली असतानाही लोक त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. सायबर पोलीस ठाण्यात जवळपास दररोजच याबाबतच्या तक्रारी दाखल होत आहेत. नवीन प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीची ८.७७ लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. भावेश मोरेश्वर उके (३७) रा. वैभवनगर, दिघोरी असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! वडिलांचा अबोला सहन न झाल्याने मुलाने संपविले जीवन

गत १४ जून रोजी भावेशच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. हा मॅसेज अनन्या मिश्रा नावाच्या तरुणीचा होता. त्यात यूट्यूबवर व्हिडिओ लाईक आणि सब्सक्राइब केल्यास पैसे मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. भावेशकडून होकार मिळताच त्याला ‘टास्क’ देण्यात आले. टास्क पूर्ण झाल्यावर त्याच्या खात्यात पैसेही जमा झाले. यामुळे त्याचा विश्वास वाढत गेला.

त्यानंतर ‘प्रिमियम टास्क’ पूर्ण केल्यास अधिक लाभ मिळण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी वेळोवेळी भावेशकडून ८.७७ लाख रुपये घेण्यात आले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. आरोपींनी भावेशची मुळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भावेशने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.