नागपूर : सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे पार्सल परत गेले आहे. ते पुन्हा हवे असल्यास विशिष्ट दूरध्वनी क्रमांकावर फोन करा, असे ग्राहकांना सांगितले जाते. तसे केल्यास ग्राहकांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढली जाते. अशाप्रकारे फसवणुकीच्या अनेक तक्रारी राज्यभरातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहे.

सध्या ऑनलाईनद्वारे वस्तू खरेदी किंवा खाद्यपदार्थ मागवले जातात. ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचा घराचा पत्ता, पिन कोड, भ्रमणध्वनी क्रमांक व अन्य तपशील द्यावा लागतो. त्यानंतर काही दिवसाने ही वस्तू ग्राहकांना घरपोच मिळते. रक्षाबंधन ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या दिवसात महिलांकडून ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढते. भावाला राख्याही कुरिअरद्वारे पाठवल्या जातात. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा प्रकार (कुरिअर स्कॅम म्हणजेच स्मिशिंग ट्रायड) शोधला आहे.

four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित
fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
an overview of explainable artificial intelligence
 कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा – आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

अशी होते फसवणूक

अशाप्रकारच्या फसवणुकीत प्रथम ग्राहकाला फोन येतो. ‘कुरिअर/डिलिव्हरी बॉय, किंवा पार्सल पोहोचवणारा कर्मचारी तुमच्या घरी आला होता. पण प्रतिसाद न मिळाल्याने किंवा अन्य कारणांमुळे पार्सल परत घेऊन गेला. ते पुन्हा हवे असेल तर कर्मचाऱ्यांना फोन करा’ असे सांगितले जाते. ग्राहक पार्सलसाठी कर्मचाऱ्याला फोन करतात. कर्मचारी त्यांना एक ‘लिंक’ पाठवतो. त्यामध्ये दिलेली माहिती भरण्यास सांगतो.

बँक खाते होते रिकामे

कर्मचाऱ्याने पाठवलेल्या लिंकवर ‘क्लिक’ केल्यानंतर ग्राहकाचा भ्रमणध्वनी ‘हॅक’ केला जातो. त्यामधून बँक खात्यातील सर्व रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केली जाते. झालेली फसवणूक लक्षात येईपर्यंत बँक खाते रिकामे झालेले असते.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी २० ला वर्धेत! देशभरातून २० हजार ‘विश्वकर्मा’ हजेरी लावणार

सायबर गुन्हेगारांकडे ‘डाटा’ येतो कुठून?

वारंवार ऑनलाईन खरेदी करणाऱ्या किंवा सतत खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ‘ॲप’वर सक्रिय असणाऱ्या ग्राहकांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना ‘ॲप’ कंपन्याकडून ग्राहकांचा डाटा (भ्रमणध्वनी क्रमांक, पत्ता) पुरवत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

‘कुरिअर बॉय’च्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगार करू शकतात. त्यामुळे कुणीही पाठवलेल्या लिंकवर ‘क्लिक’ करू नये. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. – राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा आणि सायबर विभाग