लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३७ लाख ४८ हजार रुपयांनी फसवणूक केली. अलिकडे सायबर गुन्हेगार व्हॉट्अ‍ॅपवर मॅसेज पाठवून युट्यूब वरील व्हिडीओला लाईक करण्यास सांगतात. त्याच्या बदल्यात चांगला परतावाही देतात. महिनाभर चांगला आर्थिक फायदाही मिळतो. पुढचा व्यक्ती जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच त्याला मोठे टार्गेट देवून लाखो रुपयाची गुंतवणूक करण्यास सांगतात आणि येथेच लोकांची फसवणूक होते. सायबर गुन्हेगाराकडून अशा फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या असून अनेक जण बळी पडत आहेत.

Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

गोधनी रेल्वे, मानकापूर येथील रहिवासी फिर्यादी पूजा अग्रवाल (४३) या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज आला. ओम एलआयकॉम एमइंडियाएन ग्रुप ह्युमन रिसर्चचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. युट्यूबवर लाईक करण्याचे काम दिले. दिलेल्या अवधीत काम पूर्ण झाल्यास चांगला परतावा मिळणार होता. महिलेने टार्गेट पूर्ण केले. त्यांना चांगला आर्थिक फायदा झाला.

हेही वाचा… नागपुरात कुलगुरूंच्या दालनात भाजप आमदाराचे आंदोलन, काय आहे प्रकरण वाचा

फिर्यादीला चांगला फायदा होत असल्याने त्या आरोपीच्या जाळ्यात अडकल्या. त्याने पूजा यांना क्रिप्टो करन्सी या फर्मवर खाते उघडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यामुळे पूजा यांनी ३७ लाख ४८ हजार रुपयाची गुंतवणूक केली. ती रक्कम ऑनलाईन पाठविली. यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे पूजाची चिंता वाढली. त्यांनी संपर्क साधला असता आरोपीने पुन्हा रक्कमेची मागणी केली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पूजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला.

Story img Loader