नागपूर : प्रत्येक व्यक्ती पैशाचा ऑनलाईन व्यवहार किंवा ऑनलाईन पेमेंट करीत आहे. त्यामुळे देशात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली असून फसवणूक झालेल्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १४१ कोटींना गंडा घातला आहे. सायबर पोलिसांच्या  ऑनलाईन पोर्टलवर १३ हजारांवर सायबर फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

सध्या राज्यात फायनान्सीअल फ्रॉड, बँक फ्रॉड, सोशल मीडिया फ्रॉड, सेक्स्टॉर्शन आणि डिजीटल अरेस्ट या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या जानेवारी ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत नागपूर शहरातील अनेकांना सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला आहे. अनेकांना डिजीटल अरेस्ट करुन त्यांना चोवीस तास ऑनलाईन ठेवून त्यांच्या खात्यातील पैसे परस्पर वळते केले. नागपूर शहरातील नागरिकांची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्यानंतर सायबरच्या ऑनलाईन पोर्टलवर १३ हजार १४ तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींमध्ये १४१ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची नोंद पोलिसांच्या लेखी आहे. त्यापैकी नागपूर सायबर पोलिसांनी १४४ सायबर गुन्ह्यांचा तपास केला. त्यात २१ सायबर गुन्ह्यांची उकल केली आणि त्यात २५ आरोपींना अटक केली. ५ सायबर गुन्हेगारांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले. तसेच सायबर गुन्हेगारांना अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या २२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर   कारवाई केली. ५० कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सायबर गुन्हेगारांनी गिळंकृत केलेली २८ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी बँकेत गोठवले. तसेच ३ कोटी ७५ लाख रुपये तक्रारदारांना परत केले. अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, उपायुक्त मतानी आणि सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित डोळस  यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
रत्नागिरी : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
Jahal Maoist surrenders to Gondia police
७ लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचे गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!

हेही वाचा >>>अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…

पैसे परत करण्यात राज्यात नागपूर प्रथम स्थानावर

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरात सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सर्वाधिक गुन्हे मुंबईत दाखल असून जवळपास १ हजार कोटींनी सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली. तर पुण्यात ६५० कोटींनी फसवणूक केली. तसेच नागपुरात सायबर गुन्हेगारांनी १४१ कोटींनी फसवणूक केली आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांनी हडपलेल्या रकमेपैकी सर्वाधिक ३ कोटी ७५ लाख रुपये नागपूर पोलिसांनी तक्रारदारांना परत केले. तसेच एकुण २८ कोटी ५६ लाखांची रक्कम बँके फ्रीज करण्यात नागपूर पोलिसांना यश आल्याची माहिती सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित डोळस यांनी दिली.

Story img Loader