नागपूर : एखाद्या अनोळखी क्रमांकावरून ‘व्हॉट्सॲप’वर लग्नपत्रिका पाठवल्यानंतर उत्सुकतेपोटी किंवा कुण्यातरी नातेवाईकाचे लग्न असल्याचे वाटून ती पत्रिका उघडण्यात येते. लग्नपत्रिकेच्या नावाने ‘एपीके’ असलेली ‘फाईल’ ‘डाऊनलोड’ होते. मात्र, काही क्षणातच भ्रमणध्वनीचे नियंत्रण दुसऱ्याकडे गेल्याचे लक्षात येते. हा प्रकार सायबर गुन्हेगारांचा नवा ‘सायबर स्कॅम’ आहे. आतापर्यंत राज्यभरातून अशाप्रकारची फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या आहे.

सध्या सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करीत आहे. पूर्वी बँकेतून बोलतोय किंवा तुमचे बँक खाते बंद होत असल्याची भीती घालून सायबर गुन्हेगार एटीएम कार्डचा पासवर्ड मिळून फसवणूक करीत होते. हा प्रकार जुना झाल्याने अनेक जण सतर्क झाले आहेत. त्यामुळे आता सायबर गुन्हेगारांनी सावज जाळ्यात ओढण्यासाठी भावनिक खेळ करणे सुरू केले आहे. अनेकांच्या भ्रमणध्वनीमध्ये लग्नपत्रिका ‘डॉट एपीके’ नावाने एक चित्रफीत येते. पाठवण्याऱ्यांचा क्रमांक अनोळखी असला तरीही अनेक जण कुणीतरी नातेवाईक असावा, असे गृहीत धरतात. तसेच काही जणांना उत्सुकता असते की कुण्यातरी नातेवाईकांकडे लग्न आहे. लग्नपत्रिकेच्या नावावर आलेली चित्रफीत ‘डाऊनलोड’ करतात. काही वेळताच भ्रमणध्वनी आपोआप बंद पडतो. पुन्हा सुरू केल्यानंतर काही ‘सेटिंग्स’ बदललेली दिसते. सायबर गुन्हेगार त्या ‘एपीके फाईल’च्या माध्यमातून छुप्या पद्धतीने भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवतात. त्यानंतर भ्रमणध्वनीमधील संदेश, क्रमांक, छायाचित्र, चित्रफिती, बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट ॲप यासोबतच ‘व्हॉट्सॲप’, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे नियंत्रण सायबर गुन्हेगार स्वत:कडे करून घेतात. भ्रमणध्वनीमध्ये ठेवलेले आधारकार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचाही गैरवापर करण्यात येतो.

Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Nagpur jio tower scam loksatta news
जिओ टॉवर स्कॅम : देशभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीने…
Forest Minister Ganesh Naiks first visit to Vidarbha praise work of former Forest Minister
वनमंत्र्यांच्या पहिला विदर्भ दौरा, माजी वनमंत्र्यांच्या कामाचे कौतुक
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण

हेही वाचा…नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

भ्रमणध्वनीचा ताबा मिळवून फसवणूक

सायबर गुन्हेगार सर्वाधिक वेळा पेटीएम, गुगल पे व अन्य पेमेंट ॲपचा वापर करून काही वस्तू ऑनलाईन खरेदी करतात. त्या वस्तूंचे शुल्क जाळ्यात अडकलेल्या ग्राहकाच्या ‘पेमेंट ॲप’मधून करण्यात येते. तसेच बँक खात्यातून पैसे काढून सायबर गुन्हेगार स्वतःच्या खात्यात वळते करतात. अशाप्रकारे ‘डाऊनलोड’ केलेल्या ‘एपीके फाईल’मधून भ्रमणध्वनीचा ताबा मिळवून फसवणूक करण्यात येत आहे.

हेही वाचा…वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…

‘एपीके’ (अँड्रॉईड पॅकेजिंग किट) स्वरूपाच्या ‘फाईल्स डाऊनलोड’ करू नका. कारण अशा फाईल्समधून सायबर गुन्हेगार तुमच्या भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवू शकतात. ‘व्हायरस’सुद्धा सोडू शकतात. या नव्या फसवणुकीच्या प्रकारापासून सावध राहावे. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर फोन करावा किंवा पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
अमित डोळस, पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे

Story img Loader