अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : घरी पोहचण्यासाठी केलेल्या कॅबचे भाडे चुकते केल्यानंतरही जर तुम्हाला देयक थकवल्याचे भ्रमणध्वनीवर संदेश येत असतील तर सावध व्हा. ते संदेश म्हणजे सायबर गुन्हेगारांचा फसवणूक करण्याचा नवा डाव आहे.अशा प्रकारे नागपुरातील अनेकांच्या खात्यातून पैसे लंपास केल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांच्या जन्म मेडिकलमध्ये; शासकीय रुग्णालयाबाबत काय म्हणाले पहा..
अनेकदा बसस्थानक, रेल्वेस्थानक, विमानतळ किंवा शहरातील इतर ठिकाणावरून गंतव्य स्थळी जाण्यासाठी अनेक जण ॲप आधारित टॅक्सी, ऑटो करतात.निर्धारित स्थळी पोहचल्यानंतर देयके देऊन मोकळे होतात. परंतु, आता या माध्यमातून फसवणूक होऊ लागली,अशा तक्रारी आहेत. देयके दिल्यवर ग्राहकांना भ्रमणध्वनीवर संदेश येतात की देयकांची रक्कम थकीत आहे. कृपया पैसे भरा. अन्यथा न्यायालयात खटला दाखल करून पैसे वसूल केल्या जातील.’ अशी धमकीवजा सूचना दिली जाते. संदेशात एक भ्रमणध्वनी असतो. त्यावर संपर्क करूनप्रकरणाचा निपटारा करण्याची सूचना दिलेली असते. तेथे फोन केल्यास काही रक्कम बाकी असल्याचे सांगितल्या जाते. ५० ते १०० रुपयांची रक्कम असल्यामुळे ग्राहक भरण्यास तयार होतात. फोनवरून एटीएम कार्डचा क्रमांक आणि पासवर्ड विचारण्यात येते. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती केल्या जाते.
हेही वाचा >>> तब्बल अकराशे किलोची रांगोळी!
सायबर गुन्हेगारांना विकल्या जाते माहिती
टॅक्सी बुक करणाऱ्या ग्राहकांचा भ्रमणध्वनी क्रमांक सायबर गुन्हेगारांकडे कसा गेला, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, काही टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे दलाल ग्राहकांची माहिती, संपर्क क्रमांक आणि घराचा पत्तासुद्धा सायबर गुन्हेगारांना विकतात. त्या माहितीवरून सायबर गुन्हेगार ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवे डाव टाकत असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
” अनोळखी ‘लिंक्सवर क्लिक’ करू नका. एटीएम कार्डचा पासवर्ड सांगू नका. फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. ” – संदीप बागूल, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.