वर्धा : ऑनलाईन व्यवहारातून आर्थिक फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. तरीही ठकसेन नाना शक्कल लढवून फसवणूक करीतच आहेत. साकुर्ली धानोली येथील शेतकरी हर्षल शरदराव महाबुधे यांचे पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. रात्री कोणताच व्यवहार न करता सकाळी उठून मोबाईल तपासला तेव्हा एकदा ३० हजार, परत तीन वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये व काही काळाने १५ हजार असे एकूण ८५ हजार रुपये अन्य खात्यात वळते झाल्याचे दिसून आले. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यावर महाबुधे यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार केली. दैनंदिन वापरासाठी ते फोन पे व गुगल पेचा मोबाईलद्वारे उपयोग करतात. मात्र घटनेच्या दिवशी कोणतेही ॲप डाऊनलोड केले नव्हते. कोणतीही लिंक उघडली नव्हती. तसेच कुणाचे फोनही आले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा