नागपूर : टायगर सिटी साइक्लिंग क्लबचे सदस्य आणि नागपूरचे धर्मपाल फुलझेले यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी सायकलने मनाली ते खर्दुंगला असा प्रवास सायकलने पूर्ण केला. फुलझेले हे २०२१ मधे भारतीय जीवन विमा निगममधून निवृत्त झाले होते.

यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने हिमालयन एडवेंचर ट्रेकिंग, बाईकिंग ई. उपक्रम घेतले जातात. यावर्षी ३० जून २०२३ पासून मनाली-लेह-खर्दुंगला या साइक्लिंग एक्सपेडिशनमध्ये नागपूरमधून केवळ धर्मपाल फुलझेले सहभागी झाले. तर देशभऱ्यातून ८१ सायक्लिस्ट सहभागी झाले होते.

हेही वाचा – नागपूर: खापरखेड्यातील राख बंधारा फुटला, शेतांमध्ये राख शिरली; झाले काय वाचा…

हेही वाचा – लोकजागर : नेतृत्वाचे ‘न्यूनत्व’!

नियोजनाप्रमाणे १५ माईल बेस कॅम्प कुल्लू येथून साइक्लिंगला सुरुवात झाली. मरही, सिसू, रोहतांग, जीस्पा, झिंग झिंग बार, सर्चू, बारालाचा ला, व्हिस्की नाला, डेबरिंग, लाचुंगला, रूमसे, टांगलांग ला, लेह होत हे सायकालिस्ट खरदुंग येथे दहा दिवसांत पोहोचले. तांगलांगला पास १७ हजार ४८२ फूट उंचीवर असून जगातील सर्वात उंच शिखरापैकी १२ व्या स्थानी आहे. कडाक्याची ठंडी, पाऊस, प्राणवायूची कमतरता अशा कठीण परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास व सहनशक्ती कधीच डगमगू न देता फुलझेले यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत हा प्रवास पूर्ण केला.

Story img Loader