लोकसत्ता टीम

चंद्रपूर: त्याच्या कुटुंबातील एका नातेवाईकाचा नशेने मृत्यू झाला. हा आघात त्याच्या मनावर खोलवर रूजला.आपण एकट्याने यासाठी काहीतरी उपाय करावा. ही जिद्द त्याच्यात निर्माण झाली. यासाठी तो मागील १७ वर्षापासून भारत भ्रमण करतो आहे. दरम्यान त्याने सायकल सोबतीला घेतली आहे. नशामुक्त भारतासाठी त्याने सायकलने प्रदक्षिणा घातली आहे. कर्नाटक राज्यातील अमरदीपसिंह खालसा असे त्या अवलियाचे नाव आहे. बल्लारपूर येथून नांदेड मार्गाने त्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहराजवळील चिक तिरूपती येथील अमरदीपसिंह खालसा यांनी जानेवारी २००८ मध्ये भारतासाठी नशामुक्त करण्यासाठी सायकलने प्रवास सुरु केला. या प्रवासादरम्यान त्याने मिझोराम, नागालैंड व मनिपूर वगळता सर्व राज्य पालथी घातली. विविध राज्यातील जवळपास ५२ हजार गावात जाऊन नशामुक्त संदर्भात जनजागृती केली. १७ वर्षाच्या प्रदक्षिणेदरम्यान त्यांनी 3५ हजारांवर शाळेत व महाविद्यालयात नशामुक्त भारतासाठी प्रबोधन केल्याचे त्यांनी बल्लारपूर येथे १० मार्च २०२५ रोजी आगमन झाले, त्यावेळी सांगितले.

सलग १७-१८ वर्षापासून सायकलने प्रवास करणाऱ्या अमरदीपसिंह खालसा यांचा आत्मविश्वास दांडगा आहे. त्याच्या नात्यातील मामांचे नशामुक्त पदार्थांच्या सेवनाने निधन झाले. याचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्यांनी दृढ संकल्प केला. नशामुक्त भारतासाठी सायकलने प्रदक्षिणा करण्याचा १७ वर्षापूर्वी निश्चय केला. हा दृढ संकल्प पूर्ण होत असल्याने त्यांना समाधान होत आहे.

बल्लारपूर येथील वाहतूक व्यवसायी राजेंद्रसिंह चिमा त्याचे परिचीत आहे. त्यांचेकडे अमरदीपसिंह खालसा हे १0 मार्च २0२५ रोजी परतीचा प्रवास दरम्यान थांबले आहे. येथून ते १६ मार्च रोजी नांदेड मार्गाने आपल्या कर्नाटक मध्ये स्वगावी परतीचा प्रवास सुरु करणार आहे. विशेष म्हणजे अमरदीपसिंह खालसा यांनी सर्वाधिक काळ पंजाब राज्यात घालविल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी १२ हजार ९४७ गावात नशामुक्त संदर्भात प्रबोधन केले.नशामुक्त भारतासाठी सायकलने प्रदक्षिणा घालण्याच्या संकल्प करणारे अमरदीपसिंह खालसा यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे.

ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षकाची सोडली नोकरी

अमरदीपसिंह खालसा हे बेंगलोर जवळपास चिक तिरूपती गावातील आहे. त्यांचेकडे ६0 एकरच्या आसपास शेतजमीन आहे. ते व त्यांची पत्नी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी ला आहे. एक मुलगा कान ,नाक व घसा तज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसायी अमेरिकेत आहे. सुखी व संपन्न कुटुंबातील अमरदीपसिंह खालसा यांनी नशामुक्त भारतासाठी प्रदक्षिणा करण्यासाठी शिक्षकांची नोकरी सोडली.विशेष म्हणजे त्यांनी १७ वर्षाच्या सायकलने प्रवास दरम्यान ६५ सायकल बदलून घेतली. जुनी सायकल त्यांनी गरजवंतला दिली. यासाठी त्यांना आठ लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. आज नशा गंभीर समस्या आहे. यावर उपाय म्हणून नशामुक्त भारतासाठी सायकलने प्रदक्षिणा केल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader