नागपूर : ‘फेईंगल’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही, असाच अंदाज तो येईपर्यंत दिला जात होता. मात्र, आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवू लागला आहे. राज्यातील हवामान सध्या चांगलेच बदलले असून या हवामानाला आता लोकही कंटाळले आहेत. या स्थितीत सूर्याचे क्वचितच दर्शन होत आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या तीन दिवसात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथेही जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पुढील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आत होते. मात्र, ‘फेइंगल’ चक्रीवादळाने गणित पूर्णपणे पालटले. आता तर डिसेंबर उजाडला, पण दहा अंश सेल्सिअसवर गेलेले किमान तापमान आत २० अंशावर पोहोचले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्यनारायण जराही दिसून येत नाही. अध्येमध्ये कधीतरी सूर्याचे दर्शन होते, पण ते अवघ्या काही मिनिटांकरिताच असते. डिसेंबर महिन्यात या हवामानात बदल होईल, पण जशी शक्यता होती, तशी थंडी पडण्याची सुतराम शक्यता नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा…फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”

हवामान खात्याच्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये हवामानाचे स्वरूप बदलेल अशी शक्यता आहे. थंडी आता सुरु होणार आहे. पण मागील वर्षांच्या तुलनेत यंदा थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढणार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण यंदा कमी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा अखेरचा आठवडा सोडल्यास इतर दिवसांमध्ये देशातील अनेक भागात तापमान सामान्यापेक्षा अधिक होते. त्यामुळे लोक थंडीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, ‘फेईंगल’ने थंडीचे गणित पुन्हा बदलले आहे. आता कुठे थंडी पडायला लागली होती, पण या चक्रीवादळाने थंडीच पळवली नाही तर हवामानाचे गणितही बिघडवले

Story img Loader